नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे.
बक्सर जिल्ह्यात दौऱ्यादरम्यान जमावाने त्यांच्या गाडीवर हल्ला केला. नंदर भागातून गाड्यांचा ताफा जात असतांना अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. काही लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यांना सुरक्षित तेथून आणण्यात आलं पण काही सुरक्षारक्षक यामध्ये जखमी झाले.
जमावाने केलेल्या दगडफेकीमध्ये नीतीश यांच्या ताफ्यातील गांड्यांच्या काचा फुटल्या. दगडफेकीमुळे लोकं देखील घाबरली. गावात कोणताही विकास न झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
#Visuals from Buxar's Nandan following attack on convoy of Bihar Chief Minister Nitish Kumar during a 'samiksha yatra'. CM was rescued safely but security persons were injured in the attack pic.twitter.com/cdNMV7DiCV
— ANI (@ANI) January 12, 2018
मुख्यमंत्री नीतीश कुमार सध्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बिहार राज्याचा दौरा करत आहेत. मागच्या वर्षी 7 डिसेंबरला हा दौरा सुरु झाला. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत कामांचा आढावा घेत आहेत.