'हे' 5 न्यायाधीश देणार अयोध्या खटल्या प्रकरणीचा ऐतिहासिक निर्णय

पाच न्यायाधीशांची माहिती 

Updated: Nov 9, 2019, 10:13 AM IST
'हे' 5 न्यायाधीश देणार अयोध्या खटल्या प्रकरणीचा ऐतिहासिक निर्णय  title=

मुंबई : अयोध्या खटल्या प्रकरणाचा ऐतिहासिक निर्णय आज 9 नोव्हेंबर रोजी सुनावण्यात येणार आहे. सकाळी 10.30 च्या सुमारास हा निर्णय सुनावण्यात येणार आहे. सर न्यायाधीश रंजन गोगाई यांच्यासह 5 न्यायाधीश हा निर्णय सुनावणार आहेत. सलग 40 दिवस चाललेल्या या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहेत. 

२०१० मध्ये उच्च न्यायालयाने ३० सप्टेंबरला दिलेल्या निर्णयात २:१ बहुमतानुसार वादग्रस्त भूखंड सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यामध्ये तीन भागांत या भूखंडाची विभागणी करण्याचा आदेश दिला. २०११ मध्ये इलाहबाद उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून निर्बंध लावण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर अग्रवाल, न्यायाधीश एस यू खान आणि न्यायाधीश डी वी शर्मा यांच्या खंडपीठाने निर्णय सुनावला. 

आता सुप्रीम कोर्टात सर न्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश अशोक भूषण, न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश एस अब्दुल नजीर या पाच जणांच खंडपीठ आज ऐतिहासिक निर्णय सुनावणार आहेत. 

1. सर न्यायाधीश रंजन गोगोई

रंजन गोगोई हे 3 ऑक्टोबर 2018 मध्ये भारताचे मुख्य न्यायाधीश झाले. 18 नोव्हेंबर 1954 रोजी  जन्मलेले गोगोई यांनी 1978 मध्ये बार काऊन्सिलमध्ये रूजू झाले. तसेच रंजन गोगोईंचे वडिल केशवचंद्र गोगोई दोन महिने आसामचे मुख्यमंत्री होते. दिल्ली युनिर्व्हसिटीमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुवाहाटीमधील सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली. 2010 मध्ये पंजाब आणि हरियाणा सर्वोच्च न्यायालयात आले. आणि पुढील वर्षी ते सर न्यायाधीश झाले. 

2. न्यायाधीश शरद बोबडे 
न्यायाधीश बोबडे हे नागपूरमधून आहेत. यांचे वडिल अरविंद बोबडे हे महाराष्ट्रातील ऍडवोकेट जनरल राहिले आहेत. नागपूर विद्यापीठातून त्यांनी बीए आणि एलएलबीचं शिक्षण घेतलं आहे. 1978 मध्ये बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्रात रूजू झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या नागपूर बेंचमध्ये लॉची प्रॅक्टिस केली. 1998 मध्ये ते वरिष्ठ वकिल झाले. 2000 मध्ये त्यांनी बॉम्बे हाय कोर्टमध्ये ऍडिशनल जजचा पदभार स्विकारला. त्यानंतर मध्यप्रदेशचे सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश झाले आणि 2013 मध्ये सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश झाले. 17 नोव्हेंबर रोजी सर न्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त झाल्यावर पुढील सर न्यायाधीश बोबडे असते. बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी निवृत्त होणार. 

3. न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड 

न्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे मुंबईचे आहेत. यांचे वडिल यशवंत चंद्रचूड हे देशातील सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहिलेले आहेत. दिल्ली विद्यापीठातून LLB केल्यानंतर हार्वर्ड लॉ स्कूलमध्ये वकिलीची शिक्षण घेतलं. 1998 मध्ये बॉम्ब हाय कोर्टने त्यांना सीनियर एडवोकेट पदावर रूजू झाले. यासोबत ते ऍडिशनल सोलिसिटर जनरल ऑफ इंडिया देखील राहिले आहेत. 2000 मध्ये मुंबई सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राहिले आहेत. त्यांनी 13 मे 2016 रोजी सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश पदाचा स्विकार केला. त्यांनी आतापर्यंत सबरीमाला. भीमा कोरेगाव, समलैंगिकता सारख्या मोठ्या निर्णयाबाबत खंडपीठात सहभागी होते. 

4.न्यायाधीश अशोक भूषण 

उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात राहणारे न्यायाधीश अशोक भूषण 1979 साली यूपी बार काऊन्सिलचा हिस्सा बनले. ज्यानंतर इलाहाबाद हायकोर्टमध्ये वकिलीची प्रॅक्टिस केली. त्यानंतर त्यांनी इलाहाबादच्या सर्वोच्च न्यायालयात अनेक पद स्विकारले. 2001 मध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. 2014 मध्ये केरळ सर्वोच्च न्य्यालयात न्यायाधीश - 2015 मध्ये सर न्यायाधीश झाले. 2016 13 मे मध्ये सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले तर 2017 मध्ये यांच्या उपस्थितीत पेटीशन फेटाळण्यात आली. 

5. न्यायाधीश अब्दुल नजीर 

न्यायाधीश अब्दुल नजीर कर्नाटकच्या बेलूवाईमधील. 1983 मध्ये वकिलीच शिक्षणाला सुरूवात केली. त्यांनी कर्नाटक सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. त्यानंतर ऍडिशनल जज आणि परमनंट जज म्हणून काम केलं. 17 फेब्रुवारी 2017 रोजी सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून कामकाज पाहिलं.