Jasprit Bumrah Injury Update: सिडनी कसोटीदरम्यान (Sydney Test) टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा कार्यवाहक कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah ) सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले. सिडनी कसोटी सामन्याच्या (IND vs AUS) दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर दुसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराह स्कॅनसाठी रुग्णालयात गेला होता. भारतीय संघासाठी ही अत्यंत चिंताजनक बातमी आहे. जसप्रीत बुमराहच्या जोरावरच भारत बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देत आहे.
जसप्रीत बुमराह सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (SCG) खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी दुपारी सरावाच्या कपड्यांमध्ये चेंजरूममधून बाहेर येताना दिसला. जसप्रीत बुमराहसोबत वैद्यकीय कर्मचारीही होते. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला संभाव्य दुखापत टाळण्यासाठी आधीच स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली भारतीय संघाची कमान सांभाळत आहे.
हे ही वाचा: हिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..."
Jasprit Bumrah has left the SCG: https://t.co/0nmjl6Qp2a pic.twitter.com/oQaygWRMyc
— cricket.com.au (@cricketcomau) January 4, 2025
रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहला पाठदुखीची तक्रार होती. जसप्रीत बुमराहला मालिकेदरम्यान दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही. जसप्रीत बुमराह देखील सध्या सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील ॲडलेडमध्ये पिंक बॉल कसोटीदरम्यान जखमी झाला होता, परंतु तो लवकर बरा झाला.जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 32 विकेट घेतल्या असून तो इतर गोलंदाजांपेक्षा खूप पुढे आहे.