मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा झटका, बायचुंग भूटियांचा पक्षाला सोडचिठ्ठी

तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका लागला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 26, 2018, 03:10 PM IST
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा झटका, बायचुंग भूटियांचा पक्षाला सोडचिठ्ठी title=

कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा झटका लागला आहे. 

माजी फुटबॉल खेळाडू बायचुंग भूटियाने तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. बायचुंग भूटियाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या सदस्य आणि इतर पदावरुन राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

2011 मध्ये फुटबॉलमधून संन्यास घेतल्यानंतर बायचुंग भूटियाने 2013 मध्ये टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. 2014 मध्ये दार्जिलिंग लोकसभा मतदारासंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती पण भाजपच्या एसएस अहलुवालियांकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. 2016 मध्ये बायचुंग भूटियाने विधानसभा निवडणूक देखील लढवली पण तरी यश आलं नाही. बायचुंग भूटिया भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.