BakraEid | बकरी ईदच्या निमित्ताने शेअर बाजाराला आज सुट्टी; वाचा वर्षभराचे वेळापत्रक

 शेअर मार्केटच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदचा सामावेश आहे

Updated: Jul 21, 2021, 07:46 AM IST
BakraEid | बकरी ईदच्या निमित्ताने शेअर बाजाराला आज सुट्टी; वाचा वर्षभराचे वेळापत्रक

मुंबई : शेअर मार्केटच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदचा सामावेश आहे. त्यानिमित्ताने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील सर्व सेगमेंटचे व्यवहार आज बंद राहणार आहेत. 

वायदे बाजाराचे सेगमेंटसुद्धा आज बकरी ईदच्या निमित्ताने बंद असणार आहे. जुलै महिन्यातील ही एकमेव सुटी आहे. पुढील सुटी ऑगस्ट महिन्यात मोहर्रमची(19  ऑगस्ट) असणार आहे. त्यानंतर गणेश चतुर्थी (10 सप्टेंबर)रोजी सुटी असणार आहे. 

शेअर मार्केटच्या सुट्यांचे वेळापत्रक वाचा

शेअर मार्केटला साधारण 2 महिन्यानंतर आज सुटी आहे. 13 मे रोजी रमजान ईदची सुटी होती. शेअर मार्केटला या वर्षात सर्वाधिक सुट्ट्या एप्रिल महिन्यात होत्या.