१ जानेवारीला अशा व्यक्तींचे बँक खाते होणार बंद

जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

Updated: Nov 20, 2017, 06:52 PM IST
१ जानेवारीला अशा व्यक्तींचे बँक खाते होणार बंद title=

नवी दिल्ली : जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. 

जर तुम्ही तुमचं खाते आधार कार्डशी जोडले नसेल तर तुमच्यासाठी अडचणी वाढू शकतात. नवीन वर्षात म्हणजेच 1 जानेवारीला तुमचं अकाऊंट बंद होऊ शकते.

31 डिसेंबर शेवटची तारीख

एसबीआयने ट्विट केले आहे की, '31 डिसेंबर पर्यंत आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी जोडणे बंधनकारक आहे. आपण हे न केल्यास, 1 जानेवारी नंतर तुम्हाला तुमचे खाते वापरतांना त्रास होऊ शकतो. बँकेने हे स्पष्ट केले आहे की, जे आपले खाते आधारशी जोडणार नाही त्यांचं खातं बंद करण्यात येईल.'

१ जानेवारीनंतर अकाऊंट होणार बंद

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट केले आहे. 'डिजिटल लाईफचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शक्य तितक्या लवकर आपले खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. ज्या ग्राहकांनी आधार लिंक केले नाही, त्यांचे खाते जानेवारी नंतर बंद करण्यात येईल आणि त्यानंतर आधार क्रमांक खात्याशी जोडला जाणार नाही.'