अकाऊंटमधून कापलेले पैसे एटीएममधून न आल्यास बॅंक देणार रोज १०० रूपये

रोखीने व्यवहार करताना आपण हमखास एटीएमचा वापर करतो.

Dipali Nevarekar Dipali Nevarekar | Updated: Nov 29, 2017, 09:37 AM IST
अकाऊंटमधून कापलेले पैसे एटीएममधून न आल्यास बॅंक देणार रोज १०० रूपये  title=

मुंबई : रोखीने व्यवहार करताना आपण हमखास एटीएमचा वापर करतो.

एटीमच्या रिंगेत उभे राहूनही अनेकदा ग्राहकांची गैरसोय होते. कधी पैसे नसतात, सर्व्हर डाऊन होतं तर कधी पैसे कापल्याचा मेसेज येतो पण एटीएममधून पैसेच बाहेर येत नाहीत. 

 एटीएममधून पैसे नाही आले की सहाजिकच  ग्राहक धावाधाव करतात. त्याचे रिफंड मिळण्याची वाट बघतात. पण आरबीआयच्या नियामांनुसार तुम्हांला जोपर्यंत रिफंड मिळत नाही तोपर्यंत तुम्हांला बॅंक दरदिवशी १०० रूपयेदेखील नुकसान भरापाईच्या स्वरूपात देणार. 

 
 आरबीआयचा आदेश काय ? 

 
 एटीएममधून पैसे न आल्यास ते तुम्हांला मिळावेत याकरिता खास वेळ दिला जातो. त्यासाठी मे २०११ मध्ये आरबीआयने नियम बनवला आहे.  
 बॅंकेकडे तक्रार आल्यानंतर ७ कार्यलयीन दिवसांमध्ये त्यांना पैसे परत द्यावे लागतात. 

 
काय करावे लागते ? 

३० दिवसांच्या आतमध्ये तक्रार करणं आवश्यक आहे. 
ट्रान्झॅक्शन रिसिट आणि अकाऊंट स्टेटमेंटसोबत बॅंकेत तक्रार करावी 
बॅंकेतील संबंधित व्यक्तीकडे तक्रार करताना कार्डचे तपशील द्या. 
७ दिवसांमध्ये पैसे न मिळाल्यास  एनेक्शर-5 फॉर्म भरावा. 
ज्या दिवशी फॉर्म भराल त्या दिवसापासून तुम्हांला पेनेल्टीची रक्कम मिळेल. 

ही पेनेल्टी दर दिवशी १०० रूपये इतकी आहे. बॅंकांना स्वतःहून ती ग्राहकांच्या अकाऊंटमध्ये टाकावीच लागते.