Bank holidays : जून महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद

जून महिन्यात किती दिवस बँका बंद राहणार

Updated: May 29, 2021, 05:10 PM IST
Bank holidays : जून महिन्यात इतके दिवस बँका राहणार बंद

मुंबई : कोरोना काळात बँकेत जाण्याऐवजी ऑनलाईनच व्यवहार करण्यास प्राधान्य दिलं पाहिजे. पण तरी देखील चेक क्लियरंस किंवा लोन संदर्भात बँकेत जाण्याची गरज भासते. त्यामुळे जून महिन्यात जर बँकेची कामे करण्याच्या विचारात असाल तर किती दिवस बँका बंद राहणार आहेत. हे देखील माहित हवं. 

जून 2021 मध्ये कोणत्या दिवशी बँका राहणार बंद (Bank holidays in June 2021)

6 जून 2021: रविवार असल्याने बँक बंद राहणार

12 जून 2021: दुसरा शनिवार असल्याने बँक बंद राहणार

13 जून 2021: रविवार असल्याने बँक बंद राहणार

15 जून 2021: संक्रांतीमुळे मिझोराम आणि ओडिसामध्ये बँका बंद राहणार

20 जून 2021: रविवार असल्याने बँक बंद

25 जून 2021: गुरु हरगोविंद जयंती असल्याने जम्मू-काश्मीर मध्ये बँका बंद राहणार

26 जून 2021: चौथा शनिवार असल्याने बँक बंद राहणार

27 जून 2021: रविवार असल्याने बँक बंद

30 जून 2021: रेमनानी असल्याने मिझोराममध्ये बँका बंद राहणार

जुलै महिन्यात 9 दिवस बँका बंद राहणार आहेत.

जुलै महिन्यात 9 अतिरिक्‍त दिवस बँका बंद राहतील. तसेच 6 दिवस शनिवार-रविवार मुळे बँक बंद राहणार