SBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा

Bank Jobs : बँकेत नोकरी करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटतो. त्यांना मिळणारा पगार, सुविधा पाहता आपल्यालाही अशीच एखादी नोकरी असावी अशीच इच्छा अनेकजण व्यक्तही करतात. 

सायली पाटील | Updated: Dec 27, 2023, 12:05 PM IST
SBI मध्ये चांगल्या पदावर समाधानकारक पगाराच्या नोकरीची संधी; लक्षात ठेवा 'या' तारखा  title=
bank jobs SBI Clerk Exam 2023 admit card 2023 latest updates

SBI Job Openings : (SBI) भारतीय स्टेट बँकेकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांचा पगार या आणि अशा अनेक कारणांनी इथं नोकरी करण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असल्याचं आपण पाहिलं आहे. अशा सर्व मंडळींसाठी बँकेकडूनही आता एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. बँकेनं सध्या क्लर्क पदासाठीची नोकरभरती प्रक्रिया सुरु केली आहे. ज्यासाठी बँकेच्या वतीनं नुकतीच एक घोषणा करण्यात आली असून, नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी त्याकडे विशेष लक्ष द्यावं. 

एसबीआयकडून नुकतंच क्लर्क पदासाठीच्या भरती प्रक्रियेअंतर्गत पूर्वपरीक्षा अर्थात प्रिलिम्स परीक्षेसाठीचं अॅडमिट कार्ड जारी केलं आहे. ज्या उमेदवारांनी SBI Cleark पदासाठी अर्ज केले होते ते सर्वजण आता एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर हे अॅडमिट कार्ड तपासू शकतात. हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी अर्जदारांनी नोंदणी क्रमांक (Registration Number) आणि पासवर्ड देणं अपेक्षित आहे. 

कोणत्या तारखा लक्षात ठेवाव्यात? 

 05, 06, 11 आणि 12 जानेवारीला एसबीआयकडून या पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून बँकेकडून कस्टमर सपोर्ट अँड सेल्स या विभागात कनिष्ठ पदावर 8283 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. राहिला मुद्दा हे अॅडमिट कार्ड कुठं आणि कसं पाहायचं? तर, त्याबाबतची माहितीसुद्धा पाहून घ्या. 

SBI Clerk Prelims Admit Card 2023 Download 

  • सर्वप्रथम एसबीआयच्या  sbi.co.in या संकेतस्थळावर भेट द्या. 
  • होमपेजवर उपलब्ध असणाऱ्या अॅडमिट कार्ड डाऊनलोड लिंकवर क्लिक करा. 
  • तुमच्यासमोर एक नवं वेबपेज सुरु होईल तिथं लॉगईन क्रेडेंशिअल्स भरा. 
  • पुढे सबमिटवर क्लिक करा, लगेचच अॅडमिट कार्ड तुमच्यासमोर Open होईल. 
  • हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि सोयीनुसार ते प्रिंटही करून ठेवा. 

हेसुद्धा वाचा : नव वर्षाच्या पूर्वसंध्येला Mumbai Local च्या वेळापत्रकात बदल; पाहा आणि लक्षात ठेवा 

 

एसबीआयकडून क्लर्क पदासाठीच्या परीक्षेदरम्यान पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा पार पडेल. निवडलेल्या भाषेमध्ये अर्जदार ही परीक्षा देऊ शकतात. 100 गुणांची ही ऑब्जेक्टीव्ह प्रकारची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असून, त्यासाठी उमेदवारांना 1 तास इतका वेळ देण्यात येईल. इंग्रजी, गणिक आणि तर्कशास्त्र अशा तीन विभागांवरील प्रश्न या परीक्षेत विचारले जातील. परीक्षेचा हा टप्पा ओलांडण्यापूर्वी सर्वप्रथम अर्जदारांनी अॅडमिट कार्डवरील संपूर्ण तपशील व्यवस्थित वाचून घ्यावा असा सल्ला दिला जात आहे.