Home Loan | या बँकेने केली सर्वात स्वस्त गृहकर्ज देण्याची घोषणा; 6.40%पर्यंत व्याजदर कमी

 सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)ने सणासुदीच्या दिवसांमध्ये गृहकर्ज घेऊ इच्छिनाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 

Updated: Oct 27, 2021, 11:34 AM IST
Home Loan | या बँकेने केली सर्वात स्वस्त गृहकर्ज देण्याची घोषणा; 6.40%पर्यंत व्याजदर कमी

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India)ने सणासुदीच्या दिवसांमध्ये गृहकर्ज घेऊ इच्छिनाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. 

बँकेने आपल्या कर्ज दरांमध्ये 0.40 टक्क्यांची कपात केली असून आता बँकेचे किमान व्याजदर 6.40 टक्के इतके झाले आहे. नवीन व्याजदरांची अंमलबजावणी आजपासून (27 ऑक्टोबरपासून) सुरू होणार आहे.

कोणत्या ग्राहकांना फायदा होणार?
नवीन व्याजदरे त्या ग्राहकांना लागू असतील ज्यांनी नवीन गृहकर्जासाठी अप्लाय केले आहे किंवा ज्या ग्राहकांना आपला बॅलेन्स ट्रान्सफर हवा आहे.

 बँकेच्या मते, सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होईल. युनियन बँक ऑफ इंडियाचे गृहकर्ज दर इंडस्ट्रीमध्ये सर्वात कम