नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्शभूमीवर घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणं सक्तीचं करण्यात आहे. त्यामुळे चेहऱ्याला लावलेल्या मास्क मागे नक्की कोण आहे हे ओळखणं फार कठिण झालं आहे. परिणामी बावेन्स स्टुडिओला कोरोनावर मास्क तयार करण्यासाठी भन्नाट कल्पना सुचली आहे. लोकांच्या समस्या लक्षात एका अनोख्या मास्कची निर्मिती बावेन्स स्टुडिओने केली आहे. शिवाय या मास्कची मागणी देखील बाजारात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
केरळमधील कोची आणि कोट्टायम येथील बावेन्स स्टुडिओमध्ये हे अनोखे मास्क साकारले जात आहेत. कलाविश्वातील कलाकार, इमोटिकॉन्स अशा इत्यादी गोष्टींचं परिक्षण केल्यानंतर बावेन्स स्टूडियोने त्यांची कल्पना सत्यात उतरवली आहे. बावेन्स स्टूडियोच्या एका कर्मचाऱ्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
तो म्हणाला की, 'आम्ही एक फोटो स्टुडिओ चालवितो. आणि बर्याच काळापासून आम्ही याठिकाणी सब्लिमेशन प्रिंटिंग करत आहोत. ही अशी प्रिंटिंग आहे ज्याच्या माध्यमातून आपण पन, टी-शर्ट, भेटवस्तू अशा अनेक वस्तूंवर आपल्याला हवी ती प्रिंट करू शकतो.' त्यामुळे ग्राहकांची गरज लक्षात घेत बावेन्स स्टूडियोनं आपला चेहरा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येईल असे मास्क साकारण्यास सुरूवात केली आहे.
या मास्कची चर्चा आता सर्वदूर पसरली आहे. दिल्ली आणि पुण्यात देखील या मास्कची मागणी वाढली आहे. या मास्कची किंमत पन्नास रूपये आहे. एकादा वापरल्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून पुन्हा या मास्कचा वापर केला जावू शकतो. हा अनोखा मास्क तयार करण्यासाठी फक्त २० मिनिटांचा कालावधी लागत असल्याचे स्टुडिओच्या कर्मचाऱ्याने सांगितले.