Babul Supriyo यांचा राजकारणातून सन्यास, खासदारकीचाही राजीनामा

समाजसेवा करण्यासाठी राजकरणात असण्याची आवश्यकता नाही, असं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे

Updated: Jul 31, 2021, 07:39 PM IST
Babul Supriyo यांचा राजकारणातून सन्यास, खासदारकीचाही राजीनामा

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल (West Bengal) चे भारतीय जनता पार्टी (BJP) खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुकवर एक पोस्ट लिहून त्यांनी आपल्या निर्णयाची घोषणा केली.

बाबुल सुप्रियो आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, अलविदा, मी कोणत्याही राजकीय पक्षात जात नाहीए, टीएमसी (TMC), काँग्रेस (CONGRESS) किंवा सीपीएम (CPM), कोणत्याही पक्षाने मला बोलावलं नाही, सामाजिक कार्य करण्यासाठी राजकारण सोडावं लागत आहे'

बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार पदाचा राजीनामा देऊन, मी माझे शासकीय निवसस्थान महिनाभरात सोडेन, असंही बाबुल सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बाबुल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील आसनसोलचे भाजप खासदार आहेत. राजकारणात येण्याआधी ते लोकप्रिय पार्श्वगायक होते.