फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करता येईल सोनं; वापरा ही ट्रिक आणि मिळवा शानदार रिटर्न

गोल्ड म्युच्युअल फंड ही चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये वास्तविक सोने सोबत बाळगण्याची चिंता नसते.

Updated: Oct 17, 2021, 03:21 PM IST
फक्त 500 रुपयांमध्ये खरेदी करता येईल सोनं; वापरा ही ट्रिक आणि मिळवा शानदार रिटर्न

मुंबई : सोने  खरेदीसाठी नेहमीच भारतीय उत्सुक असतात. भारतीय समाजात सोने समृद्धीचे प्रतिक आहे. सोन्यामध्ये करण्यात येणारी गुंतवणूक नेहमीच सुरक्षित मानली जाते.

सोनेचे महत्व आजही कमी झालेले नाही. सध्या शेअर मार्केटमध्ये दमदार तेजी नोंदवली जात आहे. परंतु गुंतवणूकीच्या हिशोबाने सोने हे सर्वात सुरक्षित मानले जाते. त्यामुळे मार्केटबरोबरच सोन्यात देखील गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असतात. आर्थिक सल्लागार आपल्या पोर्टफोलिओमध्ये नेहमीच 15-20 टक्के सोने असावे असा सल्ला देतात.

सध्याच्या काळात वास्तविक सोने खरेदी करण्यापेक्षा इतर पर्यायांकडे कल वाढत चालला आहे. कारण वास्तविक सोने खरेदी करणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. गोल्ड बॉंड, गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते.

गोल्ड म्युच्युअल फंड ही चांगल्या परताव्याची सुरक्षित गुंतवणूक आहे. यामध्ये वास्तविक सोने सोबत बाळगण्याची चिंता नसते. अनेक गोल्ड म्युच्युअल फंड असे आहेत. की त्यांनी फिक्स डिपॉसिटपेक्षा अधिकचा परतावा दिला आहे. 

500 रुपयांमध्ये खरेदी करा सोनं
म्युच्युअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूकीचा सर्वाधिक फायदा हा आहे की, तुम्हाला 500 रुपयांपासून सोने खरेदीची संधी मिळते. तुम्ही दरमहा SIPच्या माध्यमातून गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता.यामध्ये म्युच्युअल फंड सारखीच गुंतवणूक करावी लागते.

एक्सिस गोल्ड फंड (Axis Gold Fund), कोटक गोल्ड फंड (Kotak Gold Fund), एसबीआई गोल्ड फंड (SBI Gold Fund) आणि एचडीएफसी गोल्ड फंड (HDFC Gold Fund) हे काही गोल्ड फंड आहेत जे उत्तम परतावा देत आहेत.