Investment Plan : भविष्यातील अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज असते ती आर्थिक पाठबळाची. कारण, आर्थिक पाठबळाअभावी कैक गोष्टी शक्य होत नाहीत. त्यामुळ एका उत्तम जीलनशैलीसाठी योग्य वयात योग्य ठिकाणी करण्यात आलेली गुंतवणुकही तितकीच महत्त्वाची असते. कारण योग्य ठिकाणी करण्यात आलेली गुंतवणूक तुम्हाला मोठा फायदा देऊ शकते. याच गुंतवणुकीसाठी तुम्ही पीपीएफचा पर्याय विचारात घेऊ शकता.
पब्लिक प्रॉव्हिडिंट फंड, अर्थात पीपीएफ. इथं गुंतवणूक केली असता तुम्हाला परतव्याच्या फायद्यासोबतच करबचतीचाही फायदा मिळेल. कारण, पीपीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर सरकारी हमीसुद्धा मिळते. पण, इथं पैसे गुंतवत असताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं असतं. ज्यामुळं तुम्हाला कोट्यवधींचा फायदासुद्धा मिळू शकतो.
पीपीएफमध्ये (PPF Account) पैसे गुंतवल्यास प्रतीवर्ष 1.5 लाख रुपयांवर कलम 80 सी अंतर्गत सवलत मिळते. या खात्यात वर्षभरात किमान 500 रुपये गुंतवणं बंधनकारक असतं. या खात्यामध्ये पैसे गुंतवून विवाहितांना दुहेरी फायदा घेता येतो. कारण, ते जोडीदाराच्या नावानंसुद्धा हे खातं सुरु करू शकतात.
पीपीएफ खात्यामध्ये तुमच्या आणि जोडीदाराच्या नावानं पैसे गुंतवत दोन वेगवगेळ्या खात्यांमध्ये एका वर्षामध्ये 1.5 लाख प्रमाणं 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली दाते. या दोन्ही खात्यांवर बँक तुम्हाला स्वतंत्र व्याज देते. इथं चक्रवाढ व्याज असल्यामुळं तुम्हाला गुंतवलेल्या आणि जमा झालेल्या व्याजाच्या रकमेवरही व्याज मिळत असतं. त्यामुळं तुम्हाला इथं फायदा घेण्याची दुहेरी संधी असते.
उदाहरणार्थ, या योजनेमध्ये तुम्ही दरमहा 8 हजार रुपयांप्रमाणं 30 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर 7.1 टक्के व्याजदरानुसार तुमच्या 28 लाख 80 हजार रुपयांवर व्याज मिळून तब्बल 98,88,583 इतकी रक्कम परताव्याच्या स्वरुपात मिळते. थोडक्यात तुम्ही योग्य पद्धतीनं केलेल्या गुंतवणुकीमुळं कोट्यधीश होता असं म्हणणं वावगं ठरणार नाही.