इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. तणावातून आत्महत्या केल्याचं भैय्यू महाराजांनी या सुसाईड नोटमध्ये म्हंटलं आहे. इंदूरमधल्या आश्रमामध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर त्यांना इंदूरच्याच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. इंदूरच्या आश्रमात भय्यू महाराजांनी उजव्या कानशिलात गोळी झाडल्याचं बोललं जात आहे.
वर्षभरापूर्वीच भय्यू महाराज दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले होते. ३० एप्रिल २०१७ रोजी ग्वालियर स्थित डॉ. आयुषी शर्मा हिच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला होता. आई आणि मुलीच्या काळजीपोटी आपण दुसरा विवाह करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दुसऱ्या विवाहानंतर त्यांच्या घरात तणावाचं वातावरण असल्याचं सांगण्यात येतंय. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं आधीच निधन झालं होतं. त्यांना एक मुलगीही आहे
भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचं कारणही चर्चेत आहे. कौटुंबिक कलहाला कंटाळून त्यांनी स्वत:वर गोळी झाडल्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.
९० च्या दशकात 'सियाराम' कपड्यांसाठी मॉडेलिंग करणाऱ्या महागड्या घड्याळांची आणि कपड्यांची आवड होती... अध्यात्माची आवड असणाऱ्या भय्यूजी महाराजांनी आश्रम उभारण्यासाठी कर्ज घेतलं होतं... कर्ज शकत नसल्यानंही ते निराशेत बुडाले होते, अशीही माहिती मिळतेय. कर्जबाजारीपणाला कंटाळून भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचाही संशय व्यक्त केला जातो.