Bhakari Making Tips: भाकरी करताना आपल्याला अनेकदा अनेक कठीण गोष्टींना तोंड द्यावे लागते जसे की कधी कधी पीठ मळताना चुका होतात तर कधी लाटताना, तर कधी भाजतानाही भाकऱ्या लुसलुशीत होत नाहीत. तेव्हा करायचं काय असा प्रश्न प्रयत्न गृहिणीला पडताना दिसतो. अशातच चिंता असते ती म्हणजे भाकरी करताना तुटू लागल्या तर? कधी कधी भाकरी मळताना आपण योग्य त्या गोष्टी फॉलो केल्या नाही की तर भाकरी थापताना तुटूही शकते. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की भाकरी ही मऊ, छान आणि लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला काय काय काळजी घेणे आवश्यक आहे आणि त्याचसोबत कोणत्या गोष्टी या फॉलो करणंही आवश्यक आहे, हे समजून घेणे आवश्यक असते.
भाकरी करताना मुळात आपलं मळलेलं पीठ हे योग्य प्रमाणात असावं तरच भाकरी लुसलुशीत आणि मऊदार होईल. प्रथम पीठ चाळून घेणं हे गरजेचे असते. परंतु तरीही जर का आपल्याला भाकऱ्या या थापताना तुटत असतील तर आपल्याला त्याची योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असते त्या कोणत्या हे आपण जाऊन घेणार आहोत. मुळात भाकरी ही जास्त मऊ आणि जास्त जाड ठेवू नका.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)