लखनऊ : दोन एप्रिलला पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान सुरू झालेल्या हिंसेचे पडसाद उत्तर भारतातल्या हिंसाचार अजूनही ओसरताना दिसत नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रानं राज्यस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात केंद्रीय निमलष्करी दलाच्या तुकड्या पाठवण्यात आल्या. राजस्थानातल्या हिंडोन शहरात दुपारपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय.
जोधपूरच्या मेहसाणामध्येही उसळलेल्या हिंसेत जखमी पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झालाय तर उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये हिंसेप्रकरणी आतापर्यंत ५ हजार गुन्हे दाखल करण्यात आलेत. ३२ जणांना अटक करम्यात आलीय. मध्यप्रदेशातल्या लष्कराला तयार रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अट्रॉसिटी कायद्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष बैठक बोलावली आहे. संध्याकाळी साडेसात वाजताच्या या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनाही बोलावण्यात आले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे.