कुन्नूर: आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे. MI-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. तामिळनाडुमधल्या कुन्नूर इथे हेलिकॉप्टर कोसळलं. आतापर्यंत 13 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व मृतदेहांची DNA टेस्ट द्वारे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.
या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते. कुन्नूरमधल्या जंगल भागात या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर त्याला भीषण लागली.
या दुर्घटनेमध्ये हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. या दुर्घटनेनंतर वायुसेनेने या अपघातच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आलं असून अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
सुलूरमधून कुन्नूरला परतत होतं हेलिकॉप्टर
CDS बिपीन रावत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह वेलिंगटन इथं एका कार्यक्रमात सहभागी होण्यास गेले होते. वेलिंग्टनमध्ये लष्कराचं महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बिपीन रावत यांचं लेक्चर होतं.
या कार्यक्रमानंतर बिपीन रावत दिल्लीला रवाना होणार होते. पण कुन्नूर इथल्या घनदाट जंगलात हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की अपघात झाल्याच्या चारही बाजूंनी आगीचे लोळ दिसत होते.
लष्कर आणि वायुसेना आणि पोलिसांचं पथकाकडून बचावकार्यात वेगात सुरु आहे. घटनास्थळापासून आसपासच्या परिसरात शोधकार्य केलं जात आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार जे मृतदेह हाती लागले आहेत, ते जवळपास ८० टक्के भाजले होते.