मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलनंतर LPG सिलेंडर ही इतक्या रुपयांनी स्वस्त

महागाईच्या फटका बसत असताना मोदी सरकारचा मोठा दिलासा.

Updated: May 21, 2022, 07:06 PM IST
मोदी सरकारचा मोठा निर्णय, पेट्रोल-डिझेलनंतर LPG सिलेंडर ही इतक्या रुपयांनी स्वस्त title=

नवी दिल्ली : महागाईच्या झळा बसत असताना मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल सह सिलेंडरच्या (lpg cylinder) बाबत ही मोठा निर्णय घेतला आहे. 

केंद्राने उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर एलपीजी सिलेंडरमध्ये 200 रुपयांची कपात केली जाणार आहे. ()

कोणाला मिळणार सवलत

उज्ज्वला योजना एलपीजी सिलेंडर घेतलेल्या कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. सध्या सिलेंडरचे दर 1000 रुपयांच्या वर गेले आहेत. पण उज्ज्वला योजनेतील कुटुंबांना 200 रुपयांनी स्वस्त सिलेंडर मिळणार आहे.(Pradhan Mantri Ujjwala Yojana)

आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर वाढत असताना भारताला देखील याचा फटका बसत होता. पण केंद्र सरकारने नागरिकांना यातून दिलासा देण्यासाठी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x