Jammu Kashmir: पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात BSF अधिकारी शहीद

मंगळवारी पाकिस्तानच्या सैन्याकडून... 

Updated: Dec 1, 2020, 04:25 PM IST
Jammu Kashmir: पाकिस्तानी सैन्याकडून झालेल्या गोळीबारात BSF अधिकारी शहीद
प्रतिकात्मक छायाचित्र

श्रीनगर : मंगळवारी पाकिस्तानच्या सैन्याकडून Jammu and kashmir जम्मू आणि काश्मीरमध्ये असणाऱ्या पूंछ जिल्ह्यातील शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी शेजारी राष्ट्राच्या सैन्यानं गोळीबारही केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफमधील अधिकारी शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

बीएसएफकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार मेंढर सेक्टरमधीर तारकुंडी येथील नियंत्रण रेषा परिसरात पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. एसएचओ मंजूर अहमद कोहली यांनी बीएसएफ सब इन्स्पेक्टर शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला . 

शहीद अधिकारी हे बीएसएफच्या 59व्या बटालियचा भाग होते. सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पाकिस्तानच्या गोळीबाराचं भारताकडूनही सडेतोड उत्तर देण्यात आलं.  

BSF कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकातूनही शहीद BSF Sub Inspector Paotinsat Guite यांच्या शौर्याला सलाम करण्यात आलं. फक्त शत्रूच्या गोळीबाराचंच उत्तर देत नव्हे, तर आपल्या अनेक साथीदारांचा जीव वाचवणाऱ्या या महान शहीदाला बीएसएफनं सलाम ठोकला. 

 

शहीद BSF Sub Inspector Paotinsat Guite  यांचं पार्थिव हवाई वाहतू मार्गे प्रथम इंफाळ येथे नेण्यात येणार आहे. यानंतर पार्थिव मणिपूरमधील त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे.