Viral Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी तुडवलं; शिक्षिकांनी एकमेकींना लोळून लोळून मारलं... पाहा Video

School Teacher Fight Video: बिहार (Bihar) या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर बोलूच नये, अशी अवस्था झालीये. अशातच आता बिहारमधील शिक्षिकांचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.

Updated: May 25, 2023, 08:56 PM IST
Viral Video: झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी तुडवलं; शिक्षिकांनी एकमेकींना लोळून लोळून मारलं... पाहा Video title=
bihar school teacher Video

Teacher fighting viral video: जन्मापासून मुलांना घडवणाऱ्या तीन प्रमुख संस्था आहेत. यामध्ये कुटूंब, आजूबाजूचा समाज आणि शाळा. शाळेत मुलं सर्वधिक वेळ घालवतात. शाळेत शिकलेल्या गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे शाळा निवडताना पालक योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, जर शाळेतील शिक्षकच (School Teacher) लहान मुलांसारखं वागायला लागले तर?? पालक आणि मुलांनी बघायचं कोणाकडे? बिहार (Bihar) या राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर बोलूच नये, अशी अवस्था झालीये. अशातच आता बिहारमधील शिक्षिकांचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय.

पाटणा जिल्ह्यातील बिहटा ब्लॉकमधील कौडिया पंचायतीच्या माध्यमिक शाळेतील दोन महिला शिक्षकांमध्ये जोरदार भांडण (Bihar School Teacher Fight) झालं. दोघांमध्ये लाथा-बुक्क्यांनी मारामारी झाली. शाळेपासून ते गावच्या शेतापर्यंत दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ (Fight Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पासून अनेकांना हसू देखील आवरता आलं नाही.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन शिक्षिका एकमेकींसोबत भांडताना दिसत आहेत. तर एक शिक्षिका दुसऱ्या शिक्षिकेमागे चप्पल घेऊन पळताना दिसत आहे. तर याच व्हिडिओमध्ये तिसऱ्या शिक्षिकेने एन्ट्री मारत पहिल्या शिक्षिकेला लोळून लोळून मारलं. त्यावेळी तिच्या झिंज्या उपटल्या, तसेच लाथा बुक्यांनी देखील मारहाण केल्याचं (Bihar School Teacher Video) व्हिडिओमध्ये दिसतंय.

पाहा Video 

दरम्यान, या घटनेच्या संदर्भात बिहटा ब्लॉक शिक्षण अधिकारी नवेश कुमार यांनी माहिती दिली, हे प्रकरण ब्लॉकच्या कौरिया पंचायत माध्यमिक शाळेशी संबंधित आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या वतीने पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देण्यात आला असून, या घटनेची माहिती विभागालाही देण्यात आली आहे. या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. त्यानंतर आता वाद विकोपाला गेला आणि शिक्षिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं दिसतंय. पोरांनी देखील हीच संधी साधून शिक्षिकांच्या हाणामारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर आता व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.