Father daughter marriage tribe: वडील आणि मुलींमधलं नातं हे शब्दात सांगणं खूप अशक्य आहे. (father daughter relationship) वडील-मुलीचे नाते हे सर्वात पवित्र नाते मानले जाते. बाप आपल्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी संपूर्ण जगासोबत लढण्याची हिंमत ठेवतो. आपली मुलगी या समाजात सुरक्षित राहावी म्हणून प्रत्येक परीने बाप तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. पण जर आम्ही तुम्हाला सांगितलं कि जगात एक असा देश आहे जिथे मुलींचे लग्न फक्त वडिलांसोबत केले जातं तर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. पण हो हे खरं आहे.
हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो, पण बांगलादेश हा जगातील असाच एक देश आहे, जिथे मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.
आज जग खूप पुढे गेलं आहे आधुनिकतेची कास धरत आज जग चंद्र मंगळावर जाण्याची स्वप्न पाहत आहे प्रयत्न करत आहे .बाविसाव शतक हे आधुनिकतेच शतक आहे. आधुनिकीकरणाबरोबरच लोकांच्या जगण्याच्या पद्धतीतही बदल होऊ लागलाय.
मात्र जगात आजही अशा काही जमाती आहेत त्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत. या जमातींचे काही बाबतीतल्या प्रथा आणि नियम हे आपल्याला बुचकळ्यात पडणारे आहेत. स्वतःचे नियम आणि परंपरा आहेत, त्यांच्या काही विचित्र चालीरिती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत.
वडिलांसोबत मुलीच्या लग्नाबाबत, याच जमातीतील 30 वर्षीय ओरोला या महिलेचे म्हणणे आहे की, तिचे वडील लहान असतानाच वारले. त्यावेळी तिच्या आईने नोटेन नावाच्या दुसर्या व्यक्तीशी लग्न केले आणि त्यानंतर ती नेहमी तिच्या दुसर्या वडिलांकडे पाहत असे
आणि ते किती चांगले आहेत याचे आश्चर्य वाटायचे. पण जेव्हा ती तारुण्यात येऊ लागली, तेव्हा तिला कळले की तिचे दुसरे वडील, नोटेन हे तिचे पती आहेत ओरोलाचे लग्न तिच्या वडिलांशी झाले होते जेव्हा ती फक्त 3 वर्षांची होती. आश्चर्याची बाब म्हणजे बांगलादेशातील मंडी जातीमध्ये ही प्रथा अजूनही प्रचलित आहे.
या वाईट प्रथेनुसार, लहान वयात विधवा झालेल्या मुलींचे लग्न दुसर्या व्यक्तीशी केले जाते आणि जेव्हा त्या महिलेने मुलीला जन्म दिला तेव्हा तिचे लग्नही त्याच व्यक्तीशी केले जाते.
या व्यतिरिक्त आजही अशा अनेक मागास जाती या जगभरात आहेत ज्यांच्या चित्रविचित्र प्रथा ऐकून तुम्हाला अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की .