फेब्रुवारीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं या ३ राज्यांवर लक्ष

भाजप आणि काँग्रेसची लोकसभा निवडणुकीआधी रणनीती तयार

Updated: Jan 28, 2019, 02:49 PM IST
फेब्रुवारीमध्ये भाजप आणि काँग्रेसचं या ३ राज्यांवर लक्ष title=
लखनऊ : निवडणूक आयोग मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करु शकते. मुख्य पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेसने याआधी फेब्रुवारीमध्ये सभांचं आयोजन केलं आहे. या दरम्यान काँग्रेसचं लक्ष्य युपीतील 80 जागांवर असणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बहिण प्रियंका गांधी यांना य़ेथे मोठी जबाबदारी दिली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी 4 फेब्रुवारीला संयक्त पत्रकार परिषद घेऊ शकतात. राहुल गांधी यांची ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये 3 फेब्रुवारीला रॅली करणार आहेत. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदी 6 दिवसात 3 रॅली करणार आहेत.
 
राज्य              पक्ष विधानसभा जागा  2014 मधील लोकसभा जागा
 
उत्तरप्रदेश काँग्रेस 07 02
                   भाजप 312 73 
                    सपा 47      05
                   बसपा 19 00
 
बंगाल काँग्रेस 44 04
                  भाजप 03 02
  तृणमूल 211 34
 
ओडिशा काँग्रेस 16 00
  भाजप 10 01
  बीजद 117 20
 
4 फेब्रुवारीला प्रियंका आणि राहुल गांधी यांची संयुक्त पत्रकार परिषद होऊ शकते. याआधी दोघांनी 2004 मध्ये एकत्र पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींना अमेठीचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. पण त्यावेळी दोघांकडेही पदं नव्हती. प्रियंका गांधी मौनी अमावस्येला कुंभस्नान करण्यासाठी जावू शकतात. 10 फेब्रुवारीला वसंत पंचमीला दोघेही इलाहबादला जावू शकतात.
 
राहुल गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये 13 वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीचं नियोजन केलं आहे. त्यांची पहिली रॅली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. लखनऊमध्ये ही रॅली होणार आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आजाद यांनी म्हटलं की, इतर रॅलींची जागा अजून निश्चित केली जात आहे.
 

बंगालमध्ये भाजपचं 200 सभांचं लक्ष्य

फेब्रुवारीमध्ये अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांचं फोकस पश्चिम बंगाल असणार आहे. भाजपची येथे लोकसभा निवडणुकीच्या आधी 200 सभा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. अमित शाह यांनी 22 जानेवारीला मालदा येथून याला सुरुवात केली आहे. 29 फेब्रुवारीला देखील अमित शाहा यांनी सभा होणार आहे. 2 फेब्रुवारीला मोदी यांची ठाकुरनगर आणि दुर्गापूर येथे रॅली होणार आहे. यानंतर 8 फेब्रुवारीला सिलीगुडी येथील सभेत मोदी सहभागी होणार आहेत. मोदी-शाह यांच्या शिवाय बंगालमध्ये योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, स्मृती ईरानी आणि शिवराज सिंह चौहान यांची रॅली देखील होणार आहे.