कोलकाता : पश्चिम बंगालच्या बैरकपूरमध्ये सोमवारी भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. रविवार भाजप खासदार अर्जुन सिंह यांच्य़ावर झालेल्या हल्ल्यानंतर याच्या विरोधात भाजपने सोमवारी 12 तासांच्या बंदची घोषणा केली होती. भाजप कार्यकर्ते विरोध प्रदर्शन करत असताना टीएमसीच्या कार्यकर्ते त्यांच्यासोबत भिडले. यामध्ये भाजपचे 25 कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
बैरकपुर-बारासात भागात यानंतर तणावाचं वातावरण आहे. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील तणाव वाढतच चालला आहे.
West Bengal: 25 BJP supporters injured in a clash with TMC workers in Barrackpore. They have been taken to a hospital. BJP has called a 12-hour bandh in Barrackpore today in protest against the attack on party's MP Arjun Singh yesterday. https://t.co/xcRXIWkDu7
— ANI (@ANI) September 2, 2019
बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विवारी खासदार अर्जुन सिंह यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या गाडीची मोठ्याप्रमाणात थोडफोड करण्यात आली होती. तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.