भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील या नेत्यांचा समावेश

 भारतीय जनता पक्षाने गुरुवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपली नवीन 80 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली.

Updated: Oct 7, 2021, 03:18 PM IST
भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा, महाराष्ट्रातील या नेत्यांचा समावेश title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने गुरुवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपली नवीन 80 सदस्यीय राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये वाराणसीचे खासदार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते डॉ मुरली मनोहर जोशी यांच्यासह महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांचा समावेश आहे.

भाजपची 80 जणांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लड्डाराम नागवाणी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय प्रवक्तापदी राज्यांतून संजू वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजपचे सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गुरुवारी पक्षाच्या 80 सदस्यीय कार्यकारी समितीची घोषणा केली, ज्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, मुख्तार अब्बास नकवी, डॉ.महेंद्रनाथ पांडे, अमेठीच्या खासदार स्मृती जुबिन इराणी, फतेहपूरच्या खासदार साध्वी निरंजन ज्योती आणि मुझफ्फरनगरचे खासदार डॉ.संजीव यांचा उत्तर प्रदेशमधून एकूण 13 जणांचा समावेश करण्यात आला आहे.