दार्जिलिंग : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांना गुरूवारी दार्जिलिंगमध्ये बेदम मारहाण करण्यात आली.
घोष आणि त्यांच्या समर्थकांनी तत्काळ दार्जिलिंग सोडून जावं, यासाठी गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली. दार्जिलिंगमध्ये सध्या गोरखालँडची मागणी जोर धरतेय.
या पार्श्वभूमीवर भाजपचं शिष्टमंडळ तिथं आलं होतं. पण जीएनएलएफच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले तसंच भाजप गो बॅकच्या घोषणाही दिल्या. जन आंदोलन पार्टी आमि गोरखा जनमुक्ती मोर्चानंही भाजप शिष्टमंडळाला जोरदार विरोध केलाय...
भाजपमुळं या भागातली शांतता धोक्यात आल्याचा दावा विरोधकांनी केलाय. दरम्यान, या मारहाणीच्या निषेधार्थ कोलकात्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून निषेध केलं.