मुंबई : 12 दिवसानंतर 19 वर्षीय हरवलेल्या नर्सचा पत्ता लागला आहे. 6 एप्रिल रोजी ही नर्स आपल्या राहत्या घरातन हरवली होती. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी सकाळी नर्सच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे. याच व्यक्तीने आपल्या बायकोसाठी मैत्रिणीची हत्या केली आहे. आणि तिचा मृतदेह कोयमबेडू येथे लपवून ठेवला होता.
हरवलेल्या या नर्सचा नाव इलवीझही असं असून तिची हत्या करण्यात आली आहे. तिची हत्या मैत्रिणी महालक्ष्मीचा नवरा अजित कुमार याने केली आहे. महत्वाची बाब म्हणजे आरोपी अजित कुमार याने नर्सची हत्या करून अंगावरची 12 ग्रॅमची सोन्याची चैन, चांदीचे पैजण आणि मोबाईल चोरला आहे.
नर्सची हत्या करून चोरलेल्या वस्तू विकून हा आरोपी आपल्या पत्नीला बर्थ डे गिफ्ट देणार होता. अजित कुमारचा असा प्लान होता. नर्स इलवीझही बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केली होती. इलवीझही घरगुती आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संस्थेत काम करत होती. नर्स सतत फोनवर बोलत असायची यावरून ती प्रियकरासोबत पळून गेली की काय असा अंदाज देत अजित कुमारने पोलिसांची दिशाभूल केली.
अजित कुमारने महिनाभर आधी नोकरी सोडून आपण नवीन ठिकाणी कामाला लागलो आहे असं महालक्ष्मीला सांगितलं. एक महिन्यानंतर महालक्ष्मीने पगार मागितल्यावर मात्र गोंधळ उडाला. त्यानंतर त्याने इलवीझहीकडे पैशाची मागणी केली. तुझी चैन गहाण ठेवून मला पैसे दे असं सांगितलं. मात्र नर्स इलवीझहीने नकार दिल्यामुळे त्याने ओढणीच्या सहाय्याने तिचा गळा दाबून हत्या केली. आणि तिचा मृतदेह गोणीत भरून दूर फेकला. मात्र आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला होता.