Bride Lover Arrives At Wedding: लग्नामध्ये विघ्न आल्याच्या अनेक बातम्या आणि किस्से आपण वाचले तसेच ऐकले असतील. अनेक लग्नांमध्ये घडणारे मजेदार प्रकार वाचून हसू आल्याशिवाय राहत नाही. खास करुन सोशल मीडियावर लग्नांमध्ये घडणाऱ्या अशा मजेदार घटनांचे व्हिडीओ (viral indian wedding video) सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून खरोखर काय वेडेपणा आहे असं काही क्षण वाटून जातं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये लग्नमंडपात नवऱ्या मुलीचा प्रियकर अचानक दाखल झाल्यानंतर काय होतं यासंदर्भातील घटनाक्रम आहे. युट्यूबवर भारतीय लग्नांमध्ये होणारे गोंधळ या विषयावरील व्हिडीओंच्या एका कलेक्शनमध्ये हा मजेदार व्हिडीओ आहे.
नियोजित कार्यक्रमाप्रमाणे वधू आणि वर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालणार असतात त्याचवेळी या मुलीचा प्रियकर लग्नमंडपात दाखल होतो. त्यानंतर तो अभिनेता सनी देओलप्रमाणे फिल्मी डायलॉगबाजी करतो. व्हायरल व्हिडीओमध्ये या मुलीचा प्रियकर लग्नमंडपातील मंचाजवळ येऊन, काजल तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही? असं हातवारे करुन विचारतो. तसेच, तू या सर्वांचा विचार करु नकोस. समाजाचा विचार करुन नकोस. माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे काजल. तू सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही? असंही हा प्रियकर म्हणालो. या प्रियकराच्या एवढ्या डायलॉगबाजीनंतर ही वधूही मजेदार उत्तर देते. "मी तुला ओळखतही नाही आणि तू मला प्रेमाबद्दल सांगतोय. चल निघ इथून," असं ही मुलगी म्हणते.
हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपलं हसू अनावर झालं आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर लोकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. आता लग्न करुन दाखवं तर मानलं भावा तुला, असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने भाई, हा तर सनी देओलचा चाहता निघाला अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. अन्य एकाने हे खऱ्या अर्थाने हे अविस्मरणीय लग्न ठरलं असा टोला लगावला आहे. हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी युट्यूबवर अपलोड करण्यात आला असला तरी सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ कलेक्शनमधील शेवटच्या व्हिडीओवरुनही अनेकांनी कमेंट करुन नवऱ्या मुलाला ट्रोल केलं आहे. आपल्या आधीच्या प्रियकरला वाईट वाटावं म्हणून आपण लग्न केल्याचं वधू सांगत आहे. मात्र आपण त्याला वाईट वाटावं म्हणून लग्न केलं, त्याला आमंत्रित केलं आणि तो लग्नाला आलाच नाही असंही ती रडत रडत सांगताना दिसते.