गोवा: गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलेल्या एका ब्रिटीश महिलेवर अज्ञात लोकांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून गुन्हेगारांचा शोध सुरु केला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, ती कैनाकोना रेल्वे स्थानकावरून पालोलेम बीचवर जात होती. यावेळी काही अज्ञात लोकांनी तिला पकडले आणि तिच्यावर अत्याचार केले. सध्या गोवा गुन्हे अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पीडित तरूणीने वर्णन केलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घ्यायला सुरुवात केलेय. तसेच पीडितेची वैद्यकीय चाचणीही केली जाणार आहे.
नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी या काळात गोव्यात अनेक परदेशी पर्यटक येतात. यापैकी अनेक पर्यटक मार्च महिन्यापर्यंत गोव्यात वास्तव्याला असतात. पीडित महिलाही गोव्यात अनेकदा येत असे. ती आगामी काही दिवस दक्षिण गोव्यात राहणार होती.