Rakesh Jhunjhunwala यांनी आधीच विकले ते शेअर; सप्टेंबरपासून आजपर्यंत मोठी घसरण

 राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील तज्ज्ञ खेळाडू मानले जातात. बाजाराच्या मूडनुसार ते स्टॉक अधिक चांगल्या पद्धतीने ओळखतात असे अनेकदा दिसून येते

Updated: Dec 21, 2021, 04:43 PM IST
Rakesh Jhunjhunwala यांनी आधीच विकले ते शेअर; सप्टेंबरपासून आजपर्यंत मोठी घसरण title=

मुंबई : राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील तज्ज्ञ खेळाडू मानले जातात. बाजाराच्या मूडनुसार ते स्टॉक अधिक चांगल्या पद्धतीने ओळखतात असे अनेकदा दिसून येते. या कारणास्तव, वेळोवेळी, काही स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये जोडले जातात आणि काही कमी करतात. सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमधून फार्मा शेअर Lupin Ltd काढून टाकले होते.

Lupinच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, 1 ऑक्टोबरपासून डिसेंबर तिमाहीत स्टॉक सुमारे 8 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, 2 ब्रोकरेज हाऊसेसने देखील या स्टॉकला तटस्थ रेटिंग दिले आहे. या कंपनीतील राकेश झुनझुनवाला यांचा स्टेक आता 1 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे, जो जूनच्या तिमाहीत 1.6 टक्के होता.

डिसेंबर तिमाहीत शेअर गडगडले

सप्टेंबरच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी लुपिनच्या शेअरची किंमत 951 रुपये होती. तर आता तो 875 रुपयांच्या भावाने व्यवहार करत आहे. म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून हा शेअर सुमारे 76 रुपयांनी किंवा 8 टक्क्यांनी घसरला आहे. या वर्षाबद्दल बोलायचे झाले तर, ल्युपिनचा शेअर जवळपास 12 टक्क्यांनी तुटला आहे. त्याच वेळी, 1 वर्षातही स्टॉकमध्ये कमजोरी आहे.