BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार!

BSF Recruitment 2023: पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर...

Updated: Feb 27, 2023, 05:17 PM IST
BSF Recruitment 2023: बीएसएफमध्ये 'या' पदासाठी बंपर भरती; 69,000 पर्यंत मिळेल पगार! title=
bsf recruitment 2023 online apply

BSF Recruitment 2023: सीमा सुरक्षा दल (Border Security Force) म्हणजे बीएसएफमध्ये (BSF) कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरती प्रक्रिया (BSF Constable Recruitment) सुरू केली आहे. या रिक्‍त पदांमध्‍ये पुरूषांसाठी 1220 पदं तर महिलांसाठी 64 पदं आहेत. एकूण 1284 पदांसाठी रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. जर सरकारी नोकरीची इच्छा असेल तर तुम्हीही पटापट फॉर्म भरू शकता. 27 मार्च 2023 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जाणून घ्या सर्वकाही... (bsf recruitment 2023 bsf jobs for constable sarkari naukari apply at rectt bsf website marathi news)

अर्ज कुठे भरता येईल? (How To Apply)

तुम्ही BSF च्या अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज (bsf recruitment 2023 online apply) करू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांच्या आत असते, म्हणजेच  27 मार्च पर्यंत मुदत असेल.

परीक्षेची फी किती असेल? (Examination fee)

बीएसएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांना शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर SC, ST उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. 

वयोमर्यादा किती? (Age Limit?)

किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षे असावी.

आणखी वाचा - Google Layoffs: स्टार परफॉर्मर असतानाही गुगलने नोकरीवरुन काढलं

पगार किती मिळेल? (Salary)

निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या CPS अंतर्गत वेतन दिले जाईल. हा पगार कमीत कमी 21,700 ते जास्तीत जास्त 69,000 रुपये असणार आहे.

इथे पाहा पूर्ण जाहिरात

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा