बजेट २०१९ : रेल्वेसाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा

यंदाच्या बजेटमध्ये रेल्वे प्रवाशांना काय मिळणार ?

Updated: Jan 30, 2019, 03:54 PM IST
बजेट २०१९ : रेल्वेसाठी होऊ शकतात मोठ्या घोषणा title=

नवी दिल्ली : सरकार १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अंतरिम बजेट सादर करणार आहे. या बजेटमध्ये रेल्वे बजेट देखील असणार आहे. आता रेल्वे बजेट वेगळं सादर केलं जात नाही. यंदाच्या बजेटमध्ये रेल्वेच्या बाबतीत अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात. रेल्वेला सरकार ७० ते ७५ हजार कोटींचं बजेट देऊ शकते. मागील वर्षी रेल्वेला ५५ हजार कोटी देण्यात आले होते.

यंदाच्या बजेटमध्ये मॉर्डन सिग्नल सिस्टम लावण्याची घोषणा केली जाऊ शकते. या योजनेसाठी १२ हजार कोटी दिले जाऊ शकतात. या बजेटमध्ये अनेक रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा आणि सीसीटीव्ही लावण्याची घोषणा केली जाऊ शकते. रायबरेली कोच कारखाना आणइ चेन्नई कारखान्यासाठी देखील तरतूद केली जाऊ शकते.

भारतातील काही स्थानकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवण्याची घोषणा होऊ शकते. ट्रेन १८ ला आणखी काही स्थानकांवर चालवण्याची घोषणा केली जाऊ शकते. या ट्रेनचं नवं नाव वंदे भारत एक्सप्रेस ठेवण्यात आलं आहे.

याशिवाय प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखी काही घोषणा केल्या जाऊ शकतात. रेल्वे सध्या आर्थिक अडचणीत आहे. रेल्वेचा ऑपरेटिंग  रेषो ११८ टक्के आहे. याचा अर्थ असा की, रेल्वेमधून कमाई होत नाही आहे. रेल्वेला १०० रुपयांवर १८ रुपये खर्च करावे लागत आहे.