Budget 2021 : लाल रंगाच्या कपड्यात नाही तर 'या' ऍपवर सादर होणार बजेट

 देशाला स्वातंत्र मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ऍपच्या माध्यमातून बजेट सादर होणार आहे.   

Updated: Jan 24, 2021, 10:25 AM IST
Budget 2021 : लाल रंगाच्या कपड्यात नाही तर 'या' ऍपवर सादर होणार बजेट

नवी दिल्ली : कोरोना व्हाय़रसने फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाला प्रोत्साहत देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आर्थिक बजेट लाल रंगांच्या कपड्यात सादर न होता ऍपच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी केंद्रीय बजेट ऍप लाँच केलं आहे. ज्यामध्ये बजेट संदर्भात सर्व माहिती नागरिकांना मिळणार आहे. 

युनियन बजेट ऍपद्वारे (Union Budget Mobile App) स्मार्ट फोन यूजर्स हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांमध्ये बजेट वाचू शकतात. सामान्य जनतेपर्यंत सर्व माहिती पोहचू शकेल हाच या मागचा उद्देश आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच ऍपच्या माध्यमातून बजेट सादर होणार आहे. 

ऍप एंड्रॉयड आणि iOS या दोन्ही मोबाईलवर  उपलब्ध असणार आहे. हे मोबाईल ऍप आर्थिक माहिती विभाग (डीईए) च्या नेतृत्वात नॅशनल इनफॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी)  तयार केले आहे. आर्थिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ऍपला यूजर फ्रेंडली इंटरफेस असेल.

यामध्ये 14 वेगळ्या केद्रींय बजेटच्या कागदपत्रांचा एक्सेस यूजर्सला मिळणार आहे. त्यामध्ये फायनेंशियल स्टेटमेंट, डिमांड फॉर ग्रांट्स (DG) आणि फायनेंस बिल (Finance Bill) देखील असणार आहे. हे सर्व कागदपत्र यूजर्सला डाउनलोड देखील करता येणार आहे. 

Budget2021 दोन टप्प्यात सादर होणार आहे. पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असेल, तर दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण सभागृहात सादर करण्यात येईल. नव्या वर्षाचं बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी मांडणार आहेत.