Budget 2022: निर्मला सीतारमण यांच्या टीममध्ये आहेत हे 5 एक्सपर्ट, बजेट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका

बजेट तयार करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तयार केला जातो. ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

Updated: Feb 1, 2022, 08:54 PM IST
Budget 2022: निर्मला सीतारमण यांच्या टीममध्ये आहेत हे 5 एक्सपर्ट, बजेट तयार करण्यात महत्त्वाची भूमिका title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी संसदेत आर्थिक वर्ष 2022-23 चा अर्थसंकल्प (Union Budget 2022) सादर केला. लागोपाठ चौथ्यांदा त्यांनी अर्थसंकल्प मांडला. ज्यामुळे त्यांनी एक नवा रेकॉर्ड देखील बनवला आहे. अर्थसंकल्प तयार करताना सर्व गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. यासाठी एक विशेष तज्ज्ञ टीम असते. जाणून घेऊया निर्मला सीतारमण यांच्या टीममध्ये कोण-कोण एक्सपर्ट होते.

डॉ. टी वी सोमनाथन : तमिळनाडू कॅडरचे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. टी वी सोमनाथन सध्या अर्थ मंत्रालयात एक्सपेंडीचर सेक्रेटरी आहेत. सोमनाथन यांच्यावर बजेट 2022-23 च्या खर्चावर निश्चित सीमा ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांनी कलकत्ता विश्वविद्यालय येथून अर्थशास्त्रात पीएचडी डिग्री मिळवली आहे. 

देबाशीष पांडा : उत्तर प्रदेश कॅडरचे 1987 बॅचचे आयएएस अधिकारी देबाशीष पांडा सध्या अर्थ मंत्रालयात वित्तीय सेवा विभागात सचिव पदावर कार्यरत आहेत. पांडा यांनी बजेट 2022-23 च्या वित्तीय प्रणालीला स्थिर ठेवण्यासाठी भारतीय रिजर्व्ह बँकेसोबत काम करण्याची जबाबदारी पार पाडली. याअंतर्गतच बजेटमधील सर्व घोषणा येतात.

तरुण बजाज : हरियाणा कॅडरचे 1988 बॅचचे आयएएस अधिकारी तरुण बजाज हे अर्थ मंत्रालयात 
आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी पंतप्रधान कार्यालयात (पीएसओ) देखील काम केले आहे. आतापर्यंतच्या अर्थमंत्रालयातील आपल्या कार्यकाळात तरुण बजाज यांनी देशासाठी वेळोवेळी जाहीर केलेल्या अनेक मदत पॅकेजमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

तुहिन कांत पांडे : तुहिन कांत पांडे, ओडिशा केडरचे 1987 बॅचचे IAS अधिकारी आहेत. सध्या अर्थ मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. पांडे यांची नियुक्ती ऑक्टोबर 2019 मध्येच झाली होती. एवढेच नाही तर एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीतही पांडे यांची महत्त्वाची भूमिका होती.

अजय सेठ : अजय सेठ, कर्नाटक केडरचे 1987 च्या बॅचचे IAS अधिकारी, सध्या अर्थ मंत्रालयात आर्थिक व्यवहार सचिव म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय ते भांडवली बाजार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित धोरणांच्या मुख्य विभागांची जबाबदारीही सांभाळत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणांचा मसुदा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे.