Basic, Net आणि Gross Salary मधील नेमका फरक काय? सोप्या शब्दांत जाणून घ्या

Salary News : तुमचा सध्याचा पगार किती आणि तुम्हाला नव्या संस्थेकडून पगाराची नेमकी अपेक्षा काय? असा प्रश्न तुम्हाला नोकरी बदलताना अनेकदा केला असेल आणि तुमचा गोंधळही उडाला असेल.   

Updated: Jan 31, 2023, 02:37 PM IST
Basic, Net आणि Gross Salary मधील नेमका फरक काय? सोप्या शब्दांत जाणून घ्या  title=
budget 2023 difference between basic gross and net salary know details

Budget 2023 : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी करसवलत, कर या आणि अशा अनेक मुद्द्यांचा आपल्या खिशात येणाऱ्या पैशांवर अर्थात आपल्या पगारावर किती परिणाम होणार याचीच आकडेमोड आपण सर्वजण करू लागतो. कित्येकांनातर ही आकडेमोड अतिशय कठीण वाटते, तर काही मंडळी एका क्षणात हे गणित सोपं करून सांगतात. ग्रॉस सॅलरी म्हणजे काय, बेसिक सॅलरी किती, नेट सॅलरी किती हे असे प्रश्न विचारल्यानंतर गोंधळ उडणाऱ्यांचा तर वेगळाच गट. 

प्रत्येक नोकरदार व्यक्तीला ठाऊक असाव्यात या गोष्टी 

तुम्ही नोकरी करत असाल तर दर महिन्याला खात्यात येणाऱ्या पगारामागोमाग तुमची Salary Slip सुद्धा तयार असते. जिथं तुम्हाला बेसिक सॅलरी म्हणजेच मूळ वेतन आणि ग्रॉस सॅलरीची आकडेवारी दिसते. या दोन्ही पगारांमध्ये नेमका फरक काय? कधी प्रश्न पडलाय का? 

ग्रॉस सॅलरी (Gross Salary)

बेसिक सॅलरी किंवा मूळ वेतनासोबत महागाई भत्ता, हाउस रेंट अलाउंस, कन्वेयंस अलाउंस आणि इतर काही भत्ते आणि काही Deductions जोडून जी अंतिम रक्कम हाती येते तिला ग्रॉस सॅलरी म्हणतात. उदाहरणार्थ तुमचं मूळ वेतन 20,000 आहे. यामध्ये 4 हजार रुपये महागाई भत्ता आणि 9 हजार रुपये हाउस रेंट अलाउंस जोडल्यास तुमची ग्रॉस सॅलरी असेल 33 हजार रुपये. 

वरील दोन्ही प्रकारांव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे (Net Salary) नेट सॅलरी. ग्रॉस सॅलरीतून कर, (Provident Fund) प्रोविडेंट फंड आणि इतर गोष्टी कमी केल्यास मिळणारी रक्कम नेट सॅलरी असते. ही ती रक्कम असते जी प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात येते. 

बेसिक सॅलरी (Basic Salalry) 

मूळ वेतन किंवा बेसिक सॅलरी हा तो पगार असतो ज्यावर कंपनी किंवा संस्था आणि कर्मचारी अशी दोघांचीही सहमती असते. Salary Structure मधील हा अतिशय महत्त्वाचा भाग. बेसिक सॅलरीचं प्रमाण CTC च्या 40-45% असतं. यामध्ये HRA, Bonus, Tax Deductions, Overtime समाविष्ट नसतात. 

हेसुद्धा वाचा : Budget 2023 : पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमण किती शिकल्या आहेत माहितीये? 

 

बेसिक सॅलरीचं गणित समजून घ्या 

सध्याच्या घडीला पगाराची कोणतीही निर्धारित परिभाषा वापरात नाहीये. प्रत्येक संस्थेकडून आपआपल्या सोयीनुसार पगाराची आकडेवारी ठरवली जाते. याचा फायदा त्यात्या कंपन्यांना /संस्थांना होतो. अनेकदा कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन देण्यात येतं आणि त्यांना वाढीव भत्ते दिले जातात. पण, कंपनी मूळ वेतन त्यांच्या सोयीनुसारच का ठरवते असा उलट प्रश्न तुम्ही सहसा करु शकत नाही. पण, (Basic Salary) बेसिक सॅलरीचा आकडा अगदीच कमी असेल तर मात्र तुम्ही संबंधित HR Department शी संपर्क साधून ती वाढवण्याची विनंती करू शकता. पगाराची ही आकडेमोड कळली असेल तर ती इतरांनाही सांगा आणि यंदाच्या अर्थसंकल्पाचा तुम्हाला किती फायदा होतो हेसुद्धा पाहा.