Bulli Bai App : स्वतःला जपानी कॉमिक बुकचा नायक मानतो मास्टरमाइंड नीरज बिश्नोई

'मी जिऊ तोमिओका आहे, राक्षसाला ठार करणार'

Updated: Jan 9, 2022, 04:56 PM IST
Bulli Bai App : स्वतःला जपानी कॉमिक बुकचा नायक मानतो मास्टरमाइंड नीरज बिश्नोई title=

Bulli Bai App : मुस्लिम महिलांना टार्गेट करणाऱ्या बुल्ली बाई अॅपचा (Bulli Bai App) मास्टरमाइंड नीरज बिश्नोई अतिशय हुशार, भावनाहीन आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. हे म्हणणे आहे दिल्ली पोलिसांचे जे या २१ वर्षीय बीटेक विद्यार्थ्याची चौकशी करत आहेत. वादग्रस्त बुल्लीबाई अॅपमध्ये मुस्लिम महिलांचे एडिट केलेले फोटो अपलोड केल्याप्रकरणी नीरज हा आरोपी आहे. पोलिस कोठडीत असताना नीरजने दोनदा स्वत:ला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा पोलिसांचा दावा आहे.

नीरज स्वतःला राक्षसांचा नाश करणारा मानतो
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरजने त्याची ओळख 'जिऊ' अशी सांगतो. जिउ तोमिओका (Giyu Tomioka) हा एक जपानी कॉमिक बुक नायक आहे जो राक्षसांना मारतो. तो डेमन स्लेअर या अॅनिमेटेड मालिकेचा नायकही आहे. नीरजला काल्पनिक नायकाचा इतका मोह आहे की त्याने @giyu2002, @giyu007, @giyuu84, @giyu94 आणि @guyi44 या नावाने ट्विटरवर पाच हँडल तयार केले आहेत. नीरज याच ट्विटर हँडलवरून बुल्लीबाई अॅपची जाहिरातही करत असे.

दिल्ली पोलिसांनी दावा केला आहे की नीरजच्या लॅपटॉपची तपासणी करताना 153 वेगवेगळ्या अॅडल्ट साईटच्या लिंक सापडल्या. तो अॅडल्ट साईटचा अॅडिक्ट आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलमधील आयएफएससी युनिटचे प्रमुख डीसीपी केपीएस मल्होत्रा ​​यांनी दिलेल्या माहितीनुसार नीरज स्वतःला हॅबिच्युअल हॅकर समजतो. 

वयाच्या १५ व्या वर्षी त्याने आपल्या शाळेची वेबसाईट हॅक केल्याचा दावा त्याने केला आहे. तसंच, त्याने भारत आणि पाकिस्तानमधील अनेक शाळा आणि विद्यापीठांच्या वेबसाइट हॅक केल्याचा दावा केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ युनिट आणि आसाम पोलिसांनी मिळून नीरजला त्याच्या जोरहाट येथील घरातून अटक केली.

आत्महत्या करण्याची धमकी
नीरजने ४८ तासांच्या पोलिस कोठडीत दोनदा स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्येची धमकीही दिली, असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे. डीसीपी मल्होत्रा ​​म्हणाले, 'नीरज चौकशीत सहकार्य करत नाही. तो मानसिकदृष्ट्या स्थिर असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तपास टाळण्याासाठी तो हे सर्व करत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. 

भोपाळ स्थित वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) ने नीरजला बी.टेक वर्गातून निलंबित केलं आहे.