अंबानींच्या दुकानात विकला जाणार सरकारचा स्वस्त किराणा माल, रिलायन्स रिटेलमध्ये मिळणार पीठ, तांदूळ आणि डाळी

Reliance Retail sell Bharat products : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून भारत ब्रँडचे तांदुळ, पीठ आणि डाळी रिटेल चेनमध्ये विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सरकारकडून आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहासोबत चर्चा सुरु आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 22, 2024, 02:48 PM IST
अंबानींच्या दुकानात विकला जाणार सरकारचा स्वस्त किराणा माल, रिलायन्स रिटेलमध्ये मिळणार पीठ, तांदूळ आणि डाळी title=

Bharat Brand Product : महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून सर्व सामान्यांना परवडतील अशा कमी कमीत पीठ, तांदुळ आणि डाळींची विक्री सुरु केली. भारत ब्रँड ( Bharat Brand) नावाने स्वस्त पीठ, तांदुळ आणि डाळी विकण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वस्त रेशनचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवा यासाठी केंद्र सरकारकडून (Central Government) हे सामना रिलेटन चेनच्या माध्यमातून विकण्याचा विचार केला जात आहे.  यासाठी सरकारकडून आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स समुहासोबत चर्चा सुरु आहे. 

अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये विकलं जाणार भारत ब्रँडचं सामान
इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार भारत ब्रँडचा खप वाढवण्यासाठी रिटेल चेनच्या माध्यमातून गावा-गावात शहरा-शहरात सामान पोहोचवलं जाणार आहे. यासाठी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल्सचा पर्याय विचार करण्यात आला आहे. 

कुठे-कुठे मिळणार भारत ब्रँडचं सामान
याआधीही भारत ब्रँडचा तांदूळ, डाळी आणि पीठ रिलायन्सच्या JioMart, Amazon आणि BigBasket यासह विविध ई-कॉमर्स कंपन्यांच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. सरकारने या कंपन्यांबरोबर तात्पूरता करार केला होता. आता केंद्र सरकारकडून रिटेल कंपन्यांबरोबर दीर्घकालीन करार करण्याचा विचार सुरु आहे. यासाठी रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून भारत ब्रँडचं किराणा सामान विकलं जाणार आहे. हा करार झाल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत भारत ब्रँडचं स्वस्त किराणा सामन पोहोचणार आहे. 

रिटेल कंपन्यांबरोबर दिर्घकालीन करार
खासगी कंपन्यांबरोबर सरकार दिर्घकालीन करार करण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन भारत ब्रँडच्या प्रोडक्टती अधिक विक्री होऊ शकेल. यासाठी रिलायन्स रिटेलबरोबरच डीमार्ट आणि अन्य काही किरोकळ सामन विक्रेत्यांशीही केंद्र सरकारची चर्चा सुरु आहे. रियालन्स रिटेल (Reliace Retail) किंवा डि मार्टने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

देशभरात रिलायन्स रिटेलचं जाळं
देशभरात रिलायन्स रिटेल स्टोर्सचं जाळ पसरलं आहे. देशातील वेगवेगळ्या शहरात जवळपास 18 हजाराहून अधिक रिलायन्स रिटेल स्टोर्स आहेत. याशिवाय जिओ मार्टसारखं ऑनलाईन प्लॅटफॉर्मही आहे. त्यामुळे हा करार झाल्यास देशातील कोपऱ्या-कोपऱ्यात भारतत ब्रँडचे स्वस्त तांदुळ, पीठ, डाळ यासारखं धान्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे. 

भारत ब्रँडच्या सामानाचे दर
भारत ब्रँडच्या 10 किलो पीठाची किंमत 300 रुपये
भारत ब्रँडच्या 10 किलो तांदळाची किंमत 340 रुपये
भारत ब्रँडच्या डाळींची किंमत 70 रुपये किलो