फक्त 25 हजार रुपये गुंतवणूक अन् 3 लाख रुपये महिन्याला कमवा; सरकारी अनुदानही मिळणार

तुम्ही व्यवसायाच्या शोधात आहात का की ज्यामध्ये गुंतवणूक कमी असेल आणि कमाई देखील भरपूर होईल

Updated: Aug 14, 2021, 10:32 AM IST
फक्त 25 हजार रुपये गुंतवणूक अन् 3 लाख रुपये महिन्याला कमवा; सरकारी अनुदानही मिळणार title=

मुंबई : तुम्ही व्यवसायाच्या शोधात आहात का की ज्यामध्ये गुंतवणूक कमी असेल आणि कमाई देखील भरपूर होईल. बहुतांश व्यवसाय भरपूर गुंतवणूकीसोबतच सुरू केले जातात. परंतु छोटे व्यवसाय देखील मोठी कमाई करू शकतात. असाच एक व्यवसाय आहे. ज्यामध्ये गुंतवणूकीची रक्कम फक्त 25000 रुपये आहे. कमाई 3 लाख रुपये महिन्यापर्यंत मिळू शकते. या व्यवसायासाठी केंद्र सरकारकडून 50 टक्के सब्सिडीदेखील मिळते. (Business Opportunity)

मोत्याची शेती
मोत्याची शेती (Pearl Farming) हा एक इंटरेस्टिंग व्यवसाय आहे. शहरी भागातील लोकांना याबाबत तर माहितीही नसते. परंतु मागील काही वर्षापासून यावरील फोकस वाढत आहे. गुजरातच्या परिसरातील काही शेतकरी मोत्याच्या शेतीने लखपती बनले आहेत.

मोत्याच्या शेतीसाठी काय आवश्यक
मोत्याच्या शेतीसाठी एक तलाव गरजेचा आहे. यामध्ये सीपची भूमिका महत्वाची आहे. मोतीच्या शेतीची राज्यस्तरावर ट्रेनिंग दिली जाते. तुमच्या गुंतवणूकीवर सरकार 50 टक्के सब्सिडीदेखील देते. दक्षिण भारत आणि बिहारच्या दरभंगाचे सीपची क्वालिटी चांगली असते.

 

शेती कशी सुरू करणार?
शेती सुरू करण्यासाठी कुशल वैज्ञानिकांकडून प्रशिक्षण घेण्यात येते. अनेक संस्था मोफत ट्रेनिंग देतात. सरकारी जाहिराती किंवा मच्छिमारांपासून सीप  खरेदी करून शेती सुरू करता येते. सीपला तलावातील पाण्यात 2 दिवसांपर्यंत ठेवतात. ऊन आणि हवा  लागल्यानंतर सीपचे कवच आणि मांसपेशी सैल होता.  मांसपेशी सैल झाल्यानंतर सीपची सर्जरी केली जाते. त्यांच्या आंत सांचा टाकला जातो. सांचा जेव्हा सीपला टुचतो तेव्हा तो आतून एक द्रव्य स्ववतो. थोड्या अंतरानंतर सांचा मोतीसारखा तयार होतो.साच्यात कोणतीही आकृती टाकून तुम्ही मोती बनवू शकता. डिझाइनर मोत्यांची बाजारात चांगली मागणी असते.

सीपला तयार करण्याला साधारण 25 हजाराचा खर्च येतो. तसेच एका सीपपासून 2 मोती तयार होतात. एका मोतीची किंमत साधारण 120 रुपयांच्या आसपास असते. चांगली क्वालिटी असली तर मोती 200 रुपयांनाही विकला जाऊ शकतो.एका एकरात 25 हजार सीप टाकता येतात. यानुसार तुम्हाला साधारम 8 लाखापर्यंत गुंतवणूक लागू शकते. सीपने उत्पादन केलेल्यांपैकी 50 टक्के जर मोती व्यवस्थित काढता आले तरी वर्षाला 30 लाखापर्यंत कमाई करता येते.