लॉकडाऊन दरम्यान शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला.

Updated: Apr 21, 2020, 03:12 PM IST
लॉकडाऊन दरम्यान शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार  title=

भोपाळ : मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. लॉकडाऊन दरम्यान मध्य प्रदेशच्या 5 मंत्र्यांनी शपथ घेतली. प्रथम, नरोत्तम मिश्रा यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर, काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले तुलसी राम सिलावट, गोविंदसिंग राजपूत, कमल पटेल आणि मीना सिंह गज यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. मीना सिंह मानपूर मतदारसंघातून आमदार आहेत.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल राजभवनाच्या वतीने पुष्टी करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते नरोत्तम मिश्रा यांचा शिवराज चौहान यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले कमल पटेल यांनीही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय कमलनाथ सरकार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या सिंधियाचे समर्थक गोविंदसिंग राजपूत आणि तुलसी सिलावट यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं. मीना सिंग यांना पहिल्यांदा मंत्री करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशचे राजकारणात छोट्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून समाज आणि प्रदेश याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिंधिया छावणीतून येणार्‍या गोविंदसिंग राजपूत यांच्या मार्फत बुंदेलखंड आणि ठाकूरांना खूश करण्याचा प्रयत्न आहे. तर शक्तिशाली नेते आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या समवेत ग्वाल्हेर-चंबळ आणि ब्राह्मण वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न. नर्मदापुरममधील कमल पटेल हे ओबीसी चेहरा आहेत आणि मालवातील कमलनाथ सरकारमधील मंत्री असलेल्या तुलसी सिलावट हे एससी वर्गाचा चेहरा आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील मीना सिंग यांनाही मंत्री करण्यात आले आहे.

शिवराजसिंह चौहान यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून ते एकटेच सरकार चालवत होते. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळविना सरकार चालत असल्याबद्दल विरोधकही आक्रमक होते. अगदी काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार विवेक तंखा यांनीही राष्ट्रपतींना पत्र लिहून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती.