COVID 19 ने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार 50 हजार रुपये

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(एनडीएमए)ने शिफारस केली होती की, कोविड 19 मुळे निधन झालेल्यांच्या कुंटुंबियांना 50 हजार रुपये देण्यात यावे.

Updated: Sep 23, 2021, 10:05 AM IST
COVID 19 ने निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना केंद्र सरकार देणार 50 हजार रुपये title=

मुंबई : कोविड 19 विषाणूच्या संसर्गामुळे देशात मृत पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना Compensation amount म्हणून 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. पीटीआयच्या वृत्तानुसार राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन प्राधिकरण(एनडीएमए)ने शिफारस केली होती की, कोविड 19 च्या संसर्गामुळे निधन झालेल्यांच्या कुंटुंबियांना 50 हजार रुपये देण्यात यावे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे की, कोविड 19 संसर्गामुळे झालेल्या हानीची नुकसान भरपाई म्हणून मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मदत म्हणून 50 हजार रुपये देण्यात येतील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच आयसीएमआरतर्फे जारी दिशा - निर्देशांनुसार ही मदत देण्यात येईल. 

न्यायालयाची नाराजी
यामध्ये राज्यांतर्फे राज्य आपत्ती प्राधिकरण(एसडीआरएफ) मदत निधी प्रदान करण्यात येईल. 3 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने कोविड 19 मुळे निधन झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यासाठी दिशानिर्देश तयार करण्यात होणाऱ्या विलंबामुळे नाराजी व्यक्त केली होती.