नक्षल्यांच्या गोळीबारात शरीर जखमी पण चेहऱ्यावर हास्य कायम, भारतमातेच्या पुत्राला सलाम

 हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल

Updated: Apr 7, 2021, 11:38 AM IST
नक्षल्यांच्या गोळीबारात शरीर जखमी पण चेहऱ्यावर हास्य कायम, भारतमातेच्या पुत्राला सलाम title=

रायपूर :  सीआरपीएफच्या  विशेष लढाऊ पथक (CRPF Special Force) कोब्राचे कमांड (Cobra Command) ऑफिसर संदीप द्विवेदी vedi)(Sandiip Dwi नक्षली हल्ल्यात (Naxal Attacked) जखमी झाले आहेत. नक्षल्यांनी जवानांना घेरलं होतं. त्यांच्यावर चहुबाजूंनी फायरिंग सुरु होती. संदीप यांनी गोळ्यांचा मारा झेलला. तरीही त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.

सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागाच्या विजापूर आणि जोनागुडा भागात शनिवारी सकाळी आठच्या सुमारास संपूर्ण रात्र चाललो. नक्षलवाद्यांची हालचाल आम्हाला दिसली. त्यांनी आमच्यावर गोळ्या झाडल्या. आम्ही त्यांना योग्य उत्तरही दिले. आमच्या जवानांनी प्रचंड शौर्य दाखविले. नक्षलवाद्यांनी आम्हाला हल्ल्यात अडकविण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही तो घेरा तोडून पुढे गेलो. सीआरपीएफच्या कोबरा टीमचे सेकंट इन कमांड अधिकारी संदीप यांनी माध्यमांना ही माहीती दिली.

या हल्ल्यात संदीप जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या हातावर मलमपट्टी करण्यात आलीय. त्यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि जोश इतका आहे की दाट जंगलात नक्षलवाद्यांना आव्हान देण्यासाठी पुन्हा उभे राहतील. माध्यमांशी संवाद साधताना ते अधून मधून स्माईल करत. दरम्यान त्यांचा फोटो कोणीतरी सोशल मीडियात शेअर केला. जो आता व्हायरल झाला आहे.

विजापूरमध्ये शनिवारी झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांनी संदीप यांच्या गोळीबार केला. डोंगराच्या उंचीवरून बॉम्बस्फोट झाला. संदीप आपल्या सहकारी सैनिकांना वाचवत नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत होते. दरम्यान तिथे स्फोट झाला. त्यात संदीप गंभीर जखमी झाले. रविवारी, त्यांना हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने रायपूर येथे आणले होते. आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संदीपने प्रसारमाध्यमांशी बोलताना विजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी चकमकीशी संबंधित महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, गावातील लोक आणि स्त्रिया सैनिकांच्या प्रत्येक हालचालीची माहिती नक्षलवाद्यांना देत होते. यामुळे, नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला करण्यासाठी आधीच दूर टेकडीवर अशी स्थिती घेतली होती. जेव्हा आम्ही जोनागुडाच्या दिशेने जात होतो तेव्हा आम्हाला माहित होतं की तिथे काहीतरी घडू शकते. जेव्हा टीम तिथे गेली तेव्हा त्यांच्या बाजूने जोरदार गोळीबार झाला असे ते म्हणाले.