विमान प्रवास करा, फक्त ३९९ रूपयात

एअरलाईन्स कंपनी एअर एशियाने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर काढली आहे.

Updated: Nov 12, 2018, 05:58 PM IST
विमान प्रवास करा, फक्त ३९९ रूपयात title=

नवी दिल्ली : एअरलाईन्स कंपनी एअर एशियाने आपल्या ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर काढली आहे. या ऑफर नुसार फक्त ३९९ रूपयात देशांतर्गत प्रवास करता येणार आहे, तर फक्त १९९९ रूपयात आंतरराष्ट्रीय फ्लाईटचं तिकिट म्हणजेच परदेशात तुम्ही यात्रा करू शकतात. या ऑफरनुसार तुम्ही मे २०१९ ते फेब्रुवारी २०१० पर्यंतच्या प्रवासाचं नियोजन करू शकतात. यासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला एअर एशियाच्या वेबसाईटवर बुकिंग करावं लागेल. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे हे स्वस्त बुकिंग तुम्हाला एका बाजूच्या प्रवासासाठी मिळणार आहे.

एअर एशियाने म्हटलं आहे, ज्या प्रवाशांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी १८ नोव्हेंबरपर्यंत तिकिटांचं बुकिंग करावं. ज्यानुसार ६ मे २०१९ पासून ४ फेब्रुवारी २०२० पर्यंत सर्व आंतरदेशी आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास तुम्ही करू शकता. ही ऑफर मर्यादीत प्रवाशांसाठी आहे.

कोणत्या रूटवर मिळणार ऑफर

जे ग्राहक याचा फायदा घेऊ इच्छीतात ते, २१ रूटवर हे बुकिंग करू शकतात. यात बंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, कोच्ची, गोवा, जयपूर, पुणे, गुवाहाटी, इंफाल, विशाखापट्टणम, हैदराबाद, बागडोगरा, रांची, भुवनेश्वर आणि इंदूरचा समावेश आहे.

तसेच आंतरराष्ट्रीय रूटमध्ये क्वालालंपूर, बँककॉक, सि़डनी, ऑकलँड, मेलबर्न, सिंगापूर, बाली आणि क्राबीचा समावेश आहे.

स्वस्त हवाई प्रवासाचे हे आहेत नियम

एअरआशियानुसार, इस ऑफरचा लाभ फक्त मोठी मेंबर्स घेऊ शकतात. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग करावी लागेल. ही ऑफर एअरआशिया इंडिया, एअरआशिया बरहाद आणि एअरआशिया एक्सच्या फ्लाईटवर लागू असेल. तिकीटाचं बुकिंग तुम्ही एअरआशियाच्या वेबसाईटवर आणि अॅपवर करू शकतात. बुकिंग आणि प्रवासाआधी स्वत: सर्व नियम जाणून घेऊनच प्रवास करावा.