Pizza making without oven : आजकाल फास्ट फूड खाणाऱ्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. फास्ट फूड म्हटलं की, पिझ्झा हे नाव सर्वांच्याच तोंडावर आलंच पाहिजे. पिझ्झा म्हटलं कि सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटत..पिझ्झा आवडत नाही असा क्वचितच कोणी असेल... लहान मूलं तर पिझ्झासाठी अक्षरशः वेडी असतात.. पण दरवेळी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करायचा परवडत नाही आणि बाहेरच खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक सुद्धा आहेच .. मग अशात काय करायचं हा प्रश्न समोर असेल तर उत्तर आहे घरीच बनवा पिझ्झा..
पिझ्झा घरी कसा बनवायचा हा तर त्याहीपेक्षा पडलेला मोठा प्रश्न...कारण बऱ्याच जणांना वाटतं पिझ्झा बनवणं म्हणजे खूप अवघड काम आहे,किचकट आहे आणि वेळखाऊ सुद्धा वाटतं. पण आता काळजी करू नका आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट उपाय. (Pizza making without oven)
खास म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी तुम्हाला बेकिंगची, ओव्हनची गरज नाहीये...या खास पिझ्झाला तुम्ही हवं ते टॉपिंग्स घालून बनवू शकता आणि ते सुद्द्धा अवघ्या काही मिनिंटात.. आहे कि नाही खास !... चला तर मग जाणून घेऊया 10 मिनिटात बनणाऱ्या पिझ्झाची कृती..
साहित्य
शिमला मिरची . कांदा, टोमॅटो, आवडीच्या सर्व भाज्या व्यवस्थित धुवून त्याचे बारीक तुकडे करा. नॉन स्टिक पॅन गरम करून घ्या यावर ब्रेड स्लाइस भाजून घ्या, मग बेडवर सॉस लावून घ्या आणि आता यावर चीझ, आणि भाज्या पसरून घ्या. त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरिगानो घाला. सर्व झाल्यावर वरून प्रोसेस्ड चीझ घाला, हलकं मीठ घाला आणि हे स्लाइस ओव्हनमध्ये ठेऊन गरम करून घ्या ... ओव्हन नसेल तर तव्यावरसुद्धा शेकू शकता ... चीझ वितळू लागल्यावर बाहेर काढा आणि गरमागरम सर्व्ह करा.
चला तर मग लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणार पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा...