चेन्नईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुटुंबाला परदेशात जाण्यापासून रोखण्यासाठी एका मद्यधुंद व्यक्तीने शनिवारी दुबईला जाणारे इंडिगोचे विमान थांबण्यासाठी धक्कादायक पाऊल उचलले. चेन्नईहून दुबईला जाणारे इंडिगो विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी या व्यक्तीने दिली. यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली.
पोलीस नियंत्रण कक्षाला अज्ञात कॉल आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी इंडिगो विमानात स्फोटके ठेवण्यात आली आहेत का, याची कसून चौकशी केली. मात्र विमानात अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे अधिकारी आणि इतरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
माध्यमांच्या वृत्तानुसार, विमानतळ आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, चेन्नईचा रहिवासी असलेल्या या व्यक्तीला आपल्या कुटुंबातील दोन सदस्यांना दुबईला जाण्यापासून रोखायचे होते. त्यानंतर त्याने शहरातील पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन केला. यानंतर सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली.
विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. शोध घेतल्यानंतर ही खोटी माहिती असल्याचे समोर आलं.
सकाळी 7.20 वाजता विमान दुबईसाठी उड्डाण घेणार होते. मात्र धमकीचा फोन आल्याने तपास सुरु झाला आणि विमानाच्या उड्डाणासाठी आणखी वेळ लागला.
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली, त्यानंतर ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले. विमानतळ अधिकार्यांनी सांगितले की, पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात कॉल आल्यानंतर, इंडिगो विमानात स्फोटके ठेवण्यात आली होती की नाही हे शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी कसून तपासणी केली.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमानात अशी कोणतीही वस्तू आढळली नाही, ज्यामुळे अधिकारी आणि इतरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. फोन करणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.