छत्तीसगड : सूकमामध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत १७ जवान शहीद

कोबरा बटालियनची टीम रात्री दीड वाजता ऑपरेशनवर निघाली होती. ऑपरेशनवरून

Updated: Mar 22, 2020, 06:23 PM IST
छत्तीसगड : सूकमामध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीत १७ जवान शहीद title=

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १७ जवान शहीद झाले. शुक्रवारी रात्री एलमागुंडा जिल्ह्यात चिंतागुफामध्ये DRG, STF बुर्कापाल आणि कोबरा बटालियनची टीम रात्री दीड वाजता ऑपरेशनवर निघाली होती. ऑपरेशनवरून परतताना दुपारी दीड वाजता नक्षलवाद्यांची चकमक झाली. ही चकमक ३ तास चालली. या हल्लात काही बडे नक्षली म्होरके मारले गेल्याचीही माहिती मिळाली आहे.

हे जवान STF, DRG आणि कोबरा बटालियनचे होते. तसेच ३ डीआरजी चिंतागुफा आणि आर्मीची जवान यात सामील होते. नक्षलवाद्यांना या चकमकीनंतर १२ एके ४७ सह १५ हत्यारांची लूट केली आहे.

या चकमकीत ३ जवान शहीद झाल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी कालंच जाहीर केलं होतं. शहीद जवानांमध्ये ८ डीआरजी बुर्कापाल आणि ५ एसटीएफ बुर्कापाल असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुकमाचे एसपी शलभ सिन्हा यांनी या हल्ल्याची माहिती दिली आहे. या हल्ल्यात जखमींमध्ये 5 DRG बुर्कापाल, 4 STF बुर्कापाल, 2 DRG चिंतागुफा आणि 3 आर्मीच्या जवानांचा समावेश आहे.

यात काही नक्षलवादी मारले गेल्याचंही सांगण्यात येत आहे. तसेच आपले १५ जवान जखमी आहेत. जखमींना एअरलिफ्ट करून रायपूरमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं आहे.