रायपूर : छत्तीसगढच्या नक्षलवादी प्रभावित सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून अॅन्टी लॅंडमाइन व्हेईकलला उडवलं. या घटनेत सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले. तर काही जवान जखमी झाले आहेत.
सीआरपीएफच्या अधिका-यांनी सांगितले की, जिल्ह्यातील किस्टाराम पोलीस स्टेशन क्षेत्रात नक्षलवाद्यांनी भुसुरूंग स्फोट करत अॅन्टी लॅंडमाईन व्हेईकल उडवली. या घटनेत आठ सीआरपीएफचे जवान शहीद झालेत.
#UPDATE: 6 CRPF personnel are injured, out of which 4 are critical, after an IED blast by Naxals in Kistaram area of #Chhattisgarh's Sukma. 8 personnel have lost their lives.
— ANI (@ANI) March 13, 2018
#FLASH Eight personnel of CRPF's 212 bn lost their lives in an IED blast by Naxals in Kistaram area of #Chhattisgarh's Sukma. pic.twitter.com/pg0Z5E53qb
— ANI (@ANI) March 13, 2018
अधिका-यांनी सांगितले की, मंगळवारी सीआरपीएफच्या २१२ व्या बटालियनचे जवान अॅन्टी लॅंडमाईन व्हेईकलमध्ये बसले होते. जेव्हा ते किस्टाराम पोलीस स्टेशनच्या हद्दीत होते तेव्हा नक्षलवाद्यांनी शक्तीशाली स्फोट घडवून गाडी उडवली. या घटनेनंतर अतिरीक्त पोलीस दलाला रवाना करण्यात आले आहे. जवानांचे मृतदेह आणि जखमींना जंगलातून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.