'झुकेगा नहीं', नवजात शिशुलाही चढला पुष्पाचा फिव्हर, हा व्हिडीओ पाहाच

या बाळाचे पाय पाळण्यातच दिसलेय... पुष्पा स्टाईलमध्ये जे केलंय ते पाहून तुम्ही व्हाल थक्क

Updated: Mar 8, 2022, 05:52 PM IST
 'झुकेगा नहीं', नवजात शिशुलाही चढला पुष्पाचा फिव्हर, हा व्हिडीओ पाहाच title=

मुंबई : पुष्पा सिनेमानं बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून बॉलिवूड, राजकीय नेते सगळ्यांनीच या सिनेमातील पुष्पाचे डायलॉग, सीन कॉप करून रिल्स तयार केले. पुष्पा पार्ट 1 ला नुसतं बॉक्स ऑफिसवरच नाही तर सोशल मीडियावरही अपार प्रेम मिळालं. 

सध्या एक नवजात बाळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नवजात शिशु पुष्पा स्टाईलनं मै झुकेगा नही पुष्पा स्टाईल करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही एक क्षण म्हणाल की किती गोड आहे. या नवजात बाळालाही पुष्पाचा फिव्हर चढला आहे. अल्लू अर्जुनची सिग्नेचर स्टेप या नवजात मुलानं केली आहे. 

नवजात बाळाचा व्हिडीओ giedde नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)