तुमची मुले Online Gaming च्या आहारी नाहीत ना! तत्काळ या सूचना अंमलात आणा

मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचा ट्रेंड वाढतच आहे. ज्यामुळे अनेक मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. चीडचीड वाढल्याने मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. 

Updated: Sep 9, 2021, 02:28 PM IST
तुमची मुले Online Gaming च्या आहारी नाहीत ना! तत्काळ या सूचना अंमलात आणा title=

मुंबई : मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचा ट्रेंड वाढतच आहे. ज्यामुळे अनेक मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात येते. चीडचीड वाढल्याने मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. मुलांच्या ऑनलाईन गेम खेळण्याच्या सवयीमुळे पालकांनाही अडचणीत आणत आहेत. छतरपूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने ऑनलाईन गेममध्ये पराभूत झाल्याने आत्महत्या केली. ऑनलाईन गेमच्या नादामुळे मुलांना चोरीच्यादेखील सवयी लागत आहेत.  याशिवाय अशा अनेक घटना देशात घडल्या आहेत. सायबर सेलने मुलांसाठी काही सूचना दिल्या आहेत.

  • ऑनलाईन गेमपासून दुर राहण्यासाठी पोलिसांकडून सूचनांसोबतच अभिनव प्रयोग राबवले जात आहेत. त्याची माहिती घ्या
  • पालकांनी मुलांना विनाकारण मोबाईल देऊ नये. 
  • ऑनलाईन क्लासेससाठी विना सिमकार्डचा मोबाईल द्यावा. 
  • मुलांच्या ऑनलाईन ऍक्टिविटीकडे लक्ष द्या.
  • कुटूंबाच्या सर्व सदस्यांच्या मोबाईलमधील प्ले स्टोअरवर पॅरेंटल कंन्ट्रोल ऑन करा. मुलांना पासवर्ड सांगू नका. 
  • मुलांना ट्राजेक्शनची परवानगी देऊ नका. 

एकीकडे सायबर सेलने मुलांना मोबाईल कमी वापरण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे या दिवसांमध्ये कोरोनामुळे मुलांना ऑनलाईन शिकवले जात आहे. हे पालकांसाठी आव्हान आहे. परंतु मुलांच्या भविष्यासाठी तारेवरची कसरत पालकांनी करणे भाग आहे.