Bus Accident : शाळेची बस उलटली, 2 जणांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी

बसमधील जखमी मुलांची अवस्था पाहून लोकांच्या हृदयाचा (Sitarganj School Bus Accident) थरकाप उडाला.

Updated: Nov 14, 2022, 08:35 PM IST
Bus Accident : शाळेची बस उलटली, 2 जणांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी title=

मुंबई :  या क्षणाची मोठी बातमी (Big Breaking) समोर आली आहे. बालदिनानिमित्त (Children Day) फिरायला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला मोठा अपघात झाला आहे. बस उलटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचं म्हटलं जात आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा अपघात उत्तराखंडमधील  सितारगंज (Sitarganj)  इथे झालाय. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. (children day sitarganj school bus accident 2 death at uttarakhand many students injured)

नक्की काय झालं?  

बालदिनानिमित्ताने मोठ्या उत्साहात या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार नानकमत्ता इथे ही सहल गेली होती. तिथून परतताना संध्याकाळी सितारगंज किच्छा बायपासजवळ बस चालकाने गाडी उलट्या दिशेने नेली. या दरम्यान  किच्छा हायवेजवळील भिटोरा इथे किच्छाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक आणि बसची धडक बसली. या धडकेत बस उलटली. त्यामुळे हा सर्व अपघात घडला. या अपघातात एक विद्यार्थीनीचा आणि एक शिक्षिकेचा मृत्यू झाल्याचं समजतंय. बसमध्ये एकूण 51 विद्यार्थी आणि 7 शिक्षकेतर कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. 

अपघात झाल्यानंतर स्थानिक अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले. जखमींना रुग्णालयात पाठवण्याची सोय करण्यात आली. तसेच अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला सुरुवात केली.