नवी दिल्ली : भारताचा शेजारी चीन हा कुरापत काढण्यात आणि दूसऱ्यांच्या भूप्रदेशावर दावा करण्यात अत्यंत कुप्रसीद्ध. नुकताच त्याने ब्रह्मपुत्रा नदीच्या बहाण्याने भारताचा अविभाज्य भाग अरूणाचल प्रदेशवर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे.
अरूणाचल प्रदेशमधून वाहात असेलेल्या सिंयांग (ब्रह्मपुत्रा) नदीचे पाणी अचाणक काळे पडू लागले. या नदीचे मूळ भारताबाहेर आहे. दक्षिण तिबेटमधून वाहात भारतात येत असलेल्या या नदीच्या प्रदुषणामागे पेईचिंगचा हात असल्याचे मानले जात आहे. आता तर हद्दच झाली. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समध्ये छापलेल्या एका वृत्तानुसार ब्रह्मपुत्रेरेचे पाणी प्रदुषीत केल्याचा आरोप फेटाळून लावत चीनने उलट्या बोंबा मारल्या असून, अरूणाचल प्रदेशवर पुन्हा एकदा दावा सांगितला आहे.
ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, म्हणे अरूणाचल प्रदेश चीनचा हिस्सा आहे. त्यामुळे ब्रह्मपुत्रेला प्रदुषीत करण्याचा सवालच उपस्थित होत नाही. स्थानिक प्रसाशनाकडून मिळालेली माहिती अशी की, चीनकडून वाहात येत असलेल्या चिखल आणि कचऱ्यामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी काळे पडत आहे. सिंयाग नदी दक्षिण तिबेटमधून यारलुंग सांगपो नावाने वाहते. पुढे आसाममध्ये आल्यावर ती बह्मपुत्रा बनते. अरूणाचल प्रदेशमध्ये या नदीला सिंयाग म्हणून ओळखले जाते.
दरम्यान, भारतीय प्रसारमाध्यमांमधूनही ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी काळे पडत असल्याबाबत वृत्त आले आहे. ब्रम्हपुक्षेच्या काळ्या पाण्याबाबत वेळीच उपाययोजना केली नाही तर, पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.